Home Breaking News ग्रामीण भागातील नागरीकांना हेल्‍मेट वाटप

ग्रामीण भागातील नागरीकांना हेल्‍मेट वाटप

● चोरडीया व वाहतुक शाखेचा स्‍तुत्‍य उपक्रम

332

चोरडीया व वाहतुक शाखेचा स्‍तुत्‍य उपक्रम

wani news | स्‍वतंञ दिनाचे औचित्‍य साधुन दानशूर व्यक्तिमत्त्व विजयबाबु चोरडीया व वाहतुक शाखेच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण भागातील नागरीकांना हेल्‍मेटचे वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व ठाणेदार अजित जाधव प्रामुख्‍याने उपस्थित होते. Helmets were distributed to the citizens of rural areas.

Img 20250422 wa0027

वणी उप विभागात‍ अवघ्‍या काही महिन्‍यातच तब्‍बल 52 व्‍यक्‍तींचा अपघाती मृत्‍यू झाला. अपघाताचे प्रमाण मोठे आहे, शव विच्‍छेदन अहवालातील माहिती नुसार हेड इंज्‍यूरी हेच मुख्‍य कारण असल्‍याचे उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे यांनी स्‍पष्‍ट केले.

Img 20250103 Wa0009

हेल्‍मेट वाटप प्रसंगी आ. बोदकुरवार यांनी वाहतुक शाखेच्‍या सपोनि सिता वाघमारे यांना अनेक सुचना केल्‍यात. यावेळी ते म्‍हणाले की, दंड आकारणी न करता वाहनच काही दिवस पोलीस ठाण्‍यात जमा करा. हेल्‍मेट अतिशय गरजेचे झाले असुन यापुढे गरीब गरजुंसाठी हेल्‍मेट खरेदी करीता आमदार स्‍वतःच पुढाकार घेणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तसेच विजयबाबु चोरडीया यांचे दातृत्‍व सातत्‍याने अधोरेखीत होत असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.

याप्रसंगी विजय चोरडीया, विजय पिदुरकर, वाहतुक शाखेचे सर्व कर्मचारी आणि ग्रामीण भागातुन दररोज ये – जा करणारे लघू व्‍यवसायीक लाभार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. हेल्‍मेट वाटप अतिशय गरजेचे असुन याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या सपोनि सीता वाघमारे यांनी स्पष्ट केले.
Rokhthok News