Home Breaking News डोक्‍यावर केला दगडाने प्रहार, घडला हत्‍येचा थरार

डोक्‍यावर केला दगडाने प्रहार, घडला हत्‍येचा थरार

● तरुणीसह तिघे गजाआड

2904

तरुणीसह तिघे गजाआड

Crime News Wani | पोलीस ठाण्‍यापासुन अगदी हाकेच्‍या अंतरावरील नवनिर्माणाधिन इमारतीत अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या डोक्‍यावर दगडाने प्रहार करुन हत्‍या करण्‍यात आल्‍याची घटना घडली होती. वैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्‍छेदन बाबतचा प्रोव्‍हीजनल अहवाल देताच मंगळवार दिनांक 22 ऑगष्‍टला हत्‍येचा गुन्‍हा नोंद करुन अवघ्‍या काही वेळातच तिघांना गजाआड करण्‍यात आले. A case of murder was registered as soon as the medical officer gave the provisional post-mortem report.

Img 20250422 wa0027

अनिकेत दादाराव कुमरे (21) राहणार सिंधी तालुका मारेगांव,  मारोती लक्ष्मण कुळमेथे (34) राहणार गणेशपुर तर रोशनी कंचन भगत (25) पंचशील नगर राजूर कॉलरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. घटनेच्‍या दिवशी दिनांक 21 ऑगष्‍टला तरुणी व दोघे युवक तहसील कार्यालयाच्या निर्माणाधिन इमारतीत बसुन मद्यपान करत होते.

Img 20250103 Wa0009

तहसील जवळील बांधकाम सुरु असलेल्‍या इमारतीत तिघे बसलेले असतांनाच 40 ते 45 वर्षे वयाचा इसम त्‍या ठिकाणी पोहचला. यावेळी अनिकेत याने त्‍या अज्ञात व्‍यक्‍तीला दारु पिण्‍यासाठी शंभर रुपये मागीतले. त्‍याने शंभर रुपये दिले आणि तो रोशनी सोबत लगट करायला लागला ही बाब तेथे असलेल्‍या दोघांना खटकली आणि त्‍यांच्‍यात वाद निर्माण झाला. यावेळी अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या डोक्‍यावर, छातीवर दगडाने प्रहार करण्‍यात आल्‍याने त्‍याचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला.

सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्‍तीचा विवस्‍ञ मृतदेह आढळल्‍याने चांगलीच खळबळ माजली होती. पोलीसांनी थेट घटनास्‍थळ गाठत पंचनामा केला आणि परिस्थितीजन्‍य आकलनावरुन हत्‍येचा कयास वर्तवत वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रोव्हिजनल पी.एम. रिपोर्ट देण्याचा आग्रह केला. या अहवालात HEAD INJURY WITH MULTIPLE RIB FRACTURE” असा अभिप्राय दिल्‍यामुळे पोलीसांनी हत्‍येचा गुन्‍हा नोंद केला. पोलीसांनी तातडीने तपासयंञणा राबवत तिन्‍ही आरोपींना गजाआड केले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, API राजेश पुरी, API माया चाटसे, API माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, पंकज उंबरकर, विकास धाडसे, वसीम शेख, विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.
Rokhthok News