Home Breaking News Latest update…. नरभक्षी वाघ रेस्क्यू टीमच्या टप्प्यात, डॉट मारून बेशुद्ध करण्याचं प्लॅनिंग…!

Latest update…. नरभक्षी वाघ रेस्क्यू टीमच्या टप्प्यात, डॉट मारून बेशुद्ध करण्याचं प्लॅनिंग…!

3158

दोन बळी नंतर वनविभाग एक्शन मोड मध्ये

रोखठोक | तालुक्‍यात नरभक्षी वाघाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. रांगणा भुरकी व कोलार पिंपरी येथे वाघाने मानसावरच हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडल्यामुळे वनविभाग एक्शन मोड मध्ये आलेला आहे. रेस्क्यू पथकाने पिंजरा आणला आहे तर पुसद येथील डॉक्टर, डॉट मारून बेशुद्ध करण्याचं प्लॅनिंग करताहेत. नरभक्षी वाघ रेस्क्यू टीमच्या टप्प्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Img 20250422 wa0027

तालुक्‍यात नरभक्षी वाघाने धुमाकुळ घातला आहे. वेकोली परिसरात प्रंचड दहशतीचे वातावरण पसरले आहे. नुकत्‍याच काही दिवसांपुर्वी रांगणा भुरकी येथील अभय देवूळकर या युवकाला ठार केल्‍यानंतर दि. 27 नोव्‍हेंबर रोजी रविवारला कोलार पिंपरी येथील रामदास पिदूरकर (58) यांचेवर हल्ला चढवला त्यात त्यांना जीव गमवावा लागला. तर ब्राम्‍हणी येथे टॉवरचे काम करणाऱ्या उमेश पासवान या मजुरांवर वाघाने हल्‍ला चढवला होता त्‍यात तो गंभीर जखमी झाला होता.

Img 20250103 Wa0009

कोलार पिंपरीत वाघाने गुराख्‍याला वाघाने ठार केल्‍यानंतर आ. संजीवरेडडी बोदकुरवार व मनसेचे राज्‍य उपाध्‍यक्ष राजु उंबरकर यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले तसेच रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले होते.

पिंपळगाव शिवारात गायीचा पाडला फडशा
परिसरात वाघाने चांगलाच उच्छाद मांडला आहे, सोमवारी रात्री पिंपळगाव शिवारात गायीचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी उजागर झाली. केसुरली येथील संदीप बदखल यांची गाय पिंपळगाव येथील गुरख्याकडे ठेवण्यात आली होती. तिचा सोमवार दि.28 नोव्हेंबरला रात्री फडशा पाडण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे वाघ त्याच परिसरात असल्याचे स्पष्ट होत आहे.

वाघाला पकडण्यासाठी पथक सज्ज झाले आहे. सोमवारी रात्री कोलार पिंपरी शिवारात वाघाची चाहूल पथकाला लागली होती मात्र अंधार असल्यामुळे सावज हाती आले नाही. डॉट मारून वाघाला बेशुद्ध करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असून आजच वाघाला जेरबंद करण्यात येईल असे बोलल्या जात आहे.
वणी : बातमीदार

ही बातमी सुद्धा वाचा….

https://rokhthok.com/2022/11/28/18137/

https://rokhthok.com/2022/11/28/18144/