Home Breaking News LCB पथकाची मटका अड्डयावर धाड, चार तरुण ताब्यात

LCB पथकाची मटका अड्डयावर धाड, चार तरुण ताब्यात

1136

सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
प्रभारावरील वणी पोलीस अनभिज्ञ

रोखठोक | जिल्ह्यात नव्यानेच पोलीस अधीक्षक रुजू झाले आहेत. अवैद्य धंद्याचे उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा गुन्हे शाखा LCB ने मलाईदर पोलीस ठाण्यावर लक्ष केंद्रित केले असून मटका अड्यावर धाड टाकून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करत चौघावर कारवाई केली आहे.

Img 20250422 wa0027

शेख अल्ताफ हुसेन मन्सुर हुसेन (35) रा. शांतीनगर, अदिलाबाद, ह.मु. विराणी टॉकीज जवळ, हॉल, दिनेश प्रशांत जयवंत (46) रा. तेली फैल, अक्रम शेख याकुब शेख (27) रा. पंचशील, वि.स.बा. अशा वरली मटक्याची खायवाडी करणाऱ्या चार इसमांना ताब्यात घेत त्यांचेकडून 1 लाख 32 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल शनिवारी सायंकाळी जप्त केला आहे.

Img 20250103 Wa0009

नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी शनीवारी वणी पोलीस स्टेशनचा धावता आढावा घेतला. येथील भोंगळ कारभार त्यांनी अनुभवला असेलच. जिल्ह्यातील नामवंत पोलीस ठाणे प्रभारावर असल्याने चिंता सुध्दा व्यक्त केली असेल. नवीन अधिकारी कधी मिळेल अशी अपेक्षा वणीकर नागरिक व्यक्त करत आहे.

जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध धंद्याची इत्यंभूत माहिती असते. वणी, पांढरकवडा, राळेगांव, झरीजामणी या ठिकाणी मटका, जुगार सुरू असल्याची कुणकुण पोलीस निरीक्षक यांना लागली. त्यांनी आपल्या पथकासह शनिवारी धाडसत्र अवलंबले.

LCB पथकाला येथील वीराणी टॉकीज परिसरातील, सुराणा हॉस्पीटल चे बाजुला असलेल्या एका घराचे वरचे मजल्यावर मटका अकड्याची उतारी होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून धाड टाकली असता तेथे उतरवाडी होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे ताब्यातुन वरली मटका खेळ खेळविण्याकरीता वापरात आणलेले 12 नग मोबाईल, नगदी तसेच वरली मटका साहित्य असा एकुण 1 लाख 32 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप यांचे मार्गदर्शनात पो.नि. स्थागुशा प्रदीप परदेशी, सपोनि अमोल मुडे, सपोनि विवेक देशमुख, किशोर झेंडेकर, निलेश राठोड, महेश नाईक, मिनाक्षी फुसे, रजनिकांत मडावी, नरेश राऊत यांनी केली.
वणी: बातमीदार