Home Breaking News Lcb raid…35 जुगारी अटकेत, 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

Lcb raid…35 जुगारी अटकेत, 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

● पाटणबोरी येथील क्लब वर कारवाई ● परराज्यातील जुगाऱ्याचा समावेश

C1 20250128 09054777

पाटणबोरी येथील क्लब वर कारवाई
परराज्यातील जुगाऱ्याचा समावेश

Crime News | पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त करत असताना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पाटणबोरी येथील कोल सीटी सोशल क्लब वर धाडसत्र अवलंबण्यात आले. यावेळी 35 जुगाऱ्यांच्या मुसक्या अवळण्यात आल्या तर 45 लाख 21 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही दणदणीत कारवाई 26 जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली. Lcb raid…35 gamblers arrested, valuables worth 45 lakh seized

यवतमाळ जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटण करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने lcb पथक सतर्क झाले आहे. गोपनीय सूत्रांनी दिलेल्या टीप वरून धडाकेबाज कारवाया करण्यात येत आहे. पाटनबोरी येथील कोल सीटी सोशल क्लब मध्ये बाहेर जिल्हयातील तसेच शेजारील राज्यातील जुगारी जुगार खेळण्यासाठी येत असल्याची माहिती LCB पथकाला मिळताच धाड सत्र अवलंबण्यात आले.

संतोष के सुदर्शन, बैंकटेश्वर परलु सुब्बाराव, श्रीनिवास गंगाराजु सरस्वती, टी संतोष मधुकर तारपेल्ली, एम शेखर सुदर्शन मेदरी, गजानन इस्तारी राजन, गोणे मनोहरराव रामचंद्रराव, अंजनिल नारायणा मेरगु, कोंडलराव लिंगाराव श्रीगोंड, बालाजी जगननाथ खन्ना, पुली तिरुपती साया गौडु, विजय भास्कर गंगारेड्डी, पुरुषोत्तम भुमय्या ताटिकोंडा, गुंडेढरावी कुम्मालु गुंडेटी, मो हारुन रशिद मो शमसोद्दीन, बंदरराव रमेश चिन्ना, व्यकंट लाल कैरा, राजु उशंन्ना पारपेल्ली, राजेश्वर बुचची रेडी रतनावार, राजेंद्र किष्टया थोटा, कृष्णम्माचारी लक्ष्मीनारायण यदुलाबाद, मनोज कुमार विजयकुमार कोयाडा, राजु कोमरयया अंकती, श्रीनिवास मारकंडयया दॉतुला, जगदीश्वर विरेशंम गोरंटी, शंकर चेरालु कोडीगुडी, मनोहर किष्टंयया वडलागट्टु, रविंद्रराव जगाराव चिटीनेनी, महेंद्र मलेशंम गोरे, रामदेव चंदु गुगूलोत, व्यंकटेश यादगिरी जल्ला, सुभाष अडेल्लु मोहिजे, कंदी दामोधर राजा रेड्डी हे सर्व तेलंगणा राज्यातील आहेत तर वाय राजेशकुमार वाय सुंदरराव रा अकोली ता केळापुर व ज्ञानेश्वर उध्दव देवगडे रा भद्रावती जि चंद्रपुर असे अटकेतील जुगाऱ्यांची नावे आहेत.

Img 20250103 Wa0009

जिल्हाधिकारी यांनी सोशल क्लब करीता घालुन दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लंघन करुन पैशांची बाजी लावुन हार जितचा जुगार खेळल्या जात होता. यावरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सदर सोशल क्लब वर धाड सत्र अवलंबले. यावेळी रोकड, जुगार साहित्य, ङि.व्ही.आर, 29 मोबाईल संच, 6 चारचाकी वाहन, इंग्रजी दारु असा एकुण 45 लाख, 21 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप यांचे मार्गदर्शनात LCB प्रमुख सतिश चवरे, API अजयकुमार वाढवे, विजय महाले, PSI धनराज हाके, गजानन राजमल्लु, सै. साजीद, उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, बबलु चव्हाण, रुपेश पाली, योगेश डगवार, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, अमित झेंडेकर, सलमान शेख, देवेंद्र होले, योगेश टेकाम, सतिश फुके, अमित कुमरे सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ROKHTHOK NEWS

Previous articleaccident…भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार
Next articleधक्कादायक… ललित लांजेवार यांचे निधन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.