● काँग्रेसचे नेते मतदारसंघ सोडण्याचा मानसिकतेत नसल्याने ठाकरे गट बॅकफूटवर…..
Political News | सुनील नाईक पाटील : जिल्ह्यातील एक किंवा दोन विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाईल अशी परिस्थिती होती. शिवसेना (उबाठा) सोबतच काँग्रेस पक्षाने वणी मतदारसंघ मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. काँग्रेसचे नेते मतदारसंघ सोडण्याचा मानसिकतेत नसल्याने ठाकरे गट बॅकफूटवर गेला आहे. त्यातच काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. आठव्यांदा उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार वामनराव कासावार यांनी “लॉबिंग” सुरू केली आहे. “Lobbying” for the candidacy of former MLA Kasawar.

काँग्रेसचा पराभव कॉंग्रेसच करते असे पूर्वी बोलल्या जात होते. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या हरियाणा निवडणुकीत आला. काँग्रेस पक्षाचे नेते लोकसभा निवडणुकी नंतर प्रचंड “ओव्हर कॉन्फिडन्स” दाखवताहेत. लोकसभेतील यश एकट्याचे नसून आघाडीचे होते हे त्यांना अद्याप उमगलेच नाही. एका खासदारांचे तेरा खासदार झालेत याला महाविकास आघाडी कारणीभूत होती हेच ते विसारल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे.
राज्यात लोकसभेत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसच्या पचनी पडत नाही. अनेकांना आमदारकीचे स्वप्न पडायला लागले. काँग्रेस पक्षाच्या अति उत्साहित धोरणाचा फटका विधानसभेत महाविकास आघाडीला बसण्याची चिन्हे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्या संभाव्य उमेदवारांची गच्छंती करण्याचा जणू विडाच काहींनी उचलला की काय असे वाटायला लागले आहे.
● विमानाचे उडाण दिल्लीला
आठव्यांदा विधानसभेच्या बोहल्यावर चढण्याची तयारी माजी आमदार वामनराव कासावार यांनी केली आहे. तडकाफडकी ते आपल्या समर्थकासह दिल्लीला रवाना झाले आहेत. वणी मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला सुटणार असल्याने काँग्रेस पक्षातील संभाव्य उमेदवाराच्या आशा पल्लवित झाल्या आहे. पक्षश्रेष्ठींची नेमकी रणनीती काय आहे हे उमेदवार निश्चितीनंतर स्पष्ट होणार असले तरी खासदार प्रतिभा धानोरकरांनी वणी मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे.
Rokhthok News