Home Breaking News निष्‍ठा… महाराष्‍ट्र सैनिक ते राज्‍य उपाध्‍यक्ष

निष्‍ठा… महाराष्‍ट्र सैनिक ते राज्‍य उपाध्‍यक्ष

● इरशाद खान वाहतुक सेनेचे पदाधिकारी

337

इरशाद खान वाहतुक सेनेचे पदाधिकारी

MNS NEWS WANI | महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत निष्‍ठेला निश्चितच चांगले फळ मिळतात याचा प्रत्‍यय वणीकरांनी यापुर्वीच अनुभवला आहे. पक्षस्‍थापने पासुन मनसे नेते राजु उंबरकरांना खंबीरपणे साथ देणाऱ्या इरशाद खान यांची वाहतुक सेनेच्‍या महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्ष पदावर निवड करण्‍यात आली आहे. Irshad Khan, who has been a staunch supporter of MNS leader Raju Umbarkar since the founding of the party,

Img 20250422 wa0027

सोळा वर्षापुर्वी महाराष्‍ट्र न‍वनिर्माण सेनेची स्‍थापना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केली. तेव्‍हा पासुन राजु उंबरकर यांनी झंझावात निर्माण केला. संपूर्ण राज्यात विदर्भातील वणी उपविभाग मनसेचा गढ असल्‍याचे ओळखल्‍या जाते. उंबरकरांनी जिल्‍हा पदाधिकारी ते मनसेचा नेता होण्‍यापर्यंत मारलेली मजल अधोरेखीत करणारी आहे.

Img 20250103 Wa0009

मनेसे नेते राजु उंबरकर यांचे सोबत महाराष्‍ट्र सैनिक म्‍हणुन इरशाद खान पक्ष स्‍थापने पासुन निष्‍ठेने सोबत आहेत. कोणतेही सामाजीक, सार्वजनिक उपक्रम असो अथवा आंदोलने यात त्‍यांनी सहभाग नोंदवला आहे. कधीच कोणत्‍याही पदाची अपेक्षा नकरता त्‍यांनी बाळगलेली निष्‍ठा आज फळाला आली आहे.

पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्‍या आदेशाने मनसे नेते राजु उंबरकर यांच्‍या मार्गदर्शनात बुधवार दिनांक 9 ऑगष्‍टला महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख यांनी इरशाद खान यांची वाहतूक सेनेचे राज्‍य उपाध्यक्ष म्‍हणुन निवड केली आहे. एका निष्‍ठावंत महाराष्ट्र सैनिकाला थेट राज्य उपाध्यक्ष पद मिळाल्‍याने महाराष्ट्र सैनिकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Rokhthok News