Home Breaking News Macroon : अबब… एकवर्ष विनापरवाना चालवली शाळा..!

Macroon : अबब… एकवर्ष विनापरवाना चालवली शाळा..!

● सीबीएसईच्‍या नियमावलीला केराची टोपली ● बिअरशॉपी लगतच शैक्षणिक धडे ● आता....पालीकेने पाठवली "शो कॉज" नोटीस

1815
C1 20240209 11334494
सीबीएसईच्‍या नियमावलीला केराची टोपली
बिअरशॉपी लगतच शैक्षणिक धडे
आता….पालीकेने पाठवली “शो कॉज” नोटीस

Wani News : खाजगी शिक्षण संस्‍था चांगल्‍याच मुजोर झाल्‍या आहेत, निव्‍वळ आर्थिक स्‍वःस्‍वार्थासाठी काय करेल याचा नेम राहीला नाही. अॅफीलेशन (Affiliation) परवाना तालुक्‍यातील वडगांव टीप येथील असतांना वर्ग 1 ते 4 प्राथमिक शाळा वणी शहरात अगदी बिअर शॉपीच्‍या लगत मागील एक वर्षापासुन स्‍थलांतरीत करण्‍यात आली आहे. याप्रकरणी पालीका प्रशासनाने जागे बाबत कोणतीही ना हरकत दिलेली नाही. अखेर एक वर्षा नंतर पालीकेला जाग आल्‍याने मॅकरुन शाळेला “शोकॉज नोटीस” पाठवली आहे. The primary school has been shifted to Wani town right next to the beer shop since last one year.

Img 20250422 wa0027

संस्‍था चालकाला शहरात शाळा सुरु करायची असेल तर सर्वप्रथम नगर पालीका प्रशासनाची जागे बाबत रितसर परवानगी घेणे अभिप्रेत असते किंबहुना ती घ्‍यावीच लागते. यामध्‍ये असलेल्‍या नियमांन्‍वये परवानगी देण्‍यात येते. शाळेच्‍या लगत दारु दुकाणे, बिअर बार तसेच बिअर शॉपी नसावी असा नियम आहे. तर अगदी पंधरा ते विस मिटर अंतरावर बिअर शॉपी असतांना नियमबाह्य CBSE प्राथमिक शाळा सुरू करण्याचा अट्टाहास संस्था चालकाने केला आहे.

Img 20250103 Wa0009

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडंट अकादमी ही CBSE शाळा तालुक्यातील वडगाव टीप हद्दीत चालविण्यात येते. शाळेला संलग्नता (Affiliation) परवाना तेथील असल्याने प्राथमिक वर्ग स्थलांतरित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तसं करणं नियमबाह्य आहे. या करिता शिक्षण विभाग आणि CBSE बोर्डाची रीतसर परवानगी घ्यावी लागते.

कारवाई बाबत अंतिम नोटीस
शाळेला जेथील परवानगी असेल त्याचे तीन किलोमीटर पर्यंत प्राथमिक किंवा माध्यमिक वर्ग स्थलांतरित करता येते. मात्र मॅकरून स्टुडंट अकादमीने वणीत प्राथमिक वर्ग सुरू केले आहेत. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून चेंज रिपोर्ट घ्यावा लागतो. तो घेतलेला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यामुळे ती शाळा अनधिकृत आहे करिता अंतिम नोटीस पारित करण्यात आली असून नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी लागेल.
एस. ए. काटकर
गट शिक्षणाधिकारी, वणी
ROKHTHOK NEWS