Home Breaking News दुःखद….विजेचा शॉक, तरुणाचा मृत्यू

दुःखद….विजेचा शॉक, तरुणाचा मृत्यू

● कुलर लावणे जीवावर बेतले

1644
C1 20240928 12363223

कुलर लावणे जीवावर बेतले

Sad News : तालुक्यातील पुनवट येथील 21 वर्षीय तरुणाला विजेचा जबर शॉक लागला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर ला सायंकाळी 4: 30 वाजताच्या सुमारास घडली. A 21-year-old man from Punwat was electrocuted.

Img 20250422 wa0027

तुषार शामराव मडावी (21) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह पुनवट येथे वास्तव्यास होता. शुक्रवारी सायंकाळी घरातील कुलर लावत असताना त्याला विजेचा जबर धक्का बसला. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही बाब परिवाराला कळताच त्यांनी हंबरडा फोडला.

Img 20250103 Wa0009

या प्रकरणी ग्रामस्थांनी शिरपूर पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला. शनिवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. या दुःखद घटनेने पारिवारिक मंडळींवर शोककळा पसरली आहे.
Rokhthok News