Home Breaking News MNS : ग्रामीण भागात पक्षप्रवेशाचा झंझावात

MNS : ग्रामीण भागात पक्षप्रवेशाचा झंझावात

● महिला व तरुणांची मनसेत जोरदार Incoming

C1 20250921 07581255

महिला व तरुणांची मनसेत जोरदार Incoming

Political News :
वणी विधानसभा मतदारसंघातील वागदरा (जुना) गावातील अनेक महिला, पुरुष आणि युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढवली आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून झालेल्या या सामूहिक प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मनसेला नवी ऊर्जा मिळणार आहे. Women, men and youth activists join Maharashtra Navnirman Sena

कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले. या वेळी ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी थेट संवाद साधण्यात आला. “पुढील काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून नक्कीच यश मिळवू,” असा विश्वास मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी प्रा. राम ठमके, रामदास निखाडे, शाखा अध्यक्ष शुभम हुलके, उपाध्यक्ष आकाश राजुरकर, सूरज पाचभाई, गौरव बरडे, धनंजय खनगण, प्रकाश वैद्य, आलोक खनगण, प्रफुल उपाध्ये, आशिष वाभिटकर, निलेश जाधव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Img 20250103 Wa0009

याप्रसंगी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष अंकुश बोढे, व्यापारी सेना शहराध्यक्ष राकेश वैद्य, शंकर पिंपळकर, मयूर घाटोळे, प्रवीण कळसकर, लक्की सोमकुंवर, अमर पाचभाई, भोला चिकनकर, हिरा गोहोकार, अक्षय बोकडे आदी मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Rokhthok