● शेतकरी प्रश्नांकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष
Political News :
वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक भूमिकेत उतरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील भीषण अतिवृष्टी, वारंवार होत असलेली पिकांची नासधूस आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गंभीर प्रश्नांकडे महायुती सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले असून, सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी मंगळवारी डफडे आंदोलन करण्यात येणार आहे. The Mahayuti government’s complete disregard for farmers’ issues
मंगळवार, दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता वणी तहसील कार्यालयावर शिवसेना डफडे आंदोलन करणार आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या वेदना, अन्याय आणि सरकारच्या ढोंगी भूमिकेविरोधातील तीव्र आवाज ठरणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतीवृष्टी झाली सगळा शेतकरी हवालदील झालेला असतांना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या रेटून धरल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहिर करावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या महत्वपूर्ण मागण्याचा समावेश आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनामुळे महायुती सरकारची खोटी आश्वासने आणि निष्क्रियता उघडकीस येणार आहे. तरी महायुती सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी वणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सामिल व्हावे असे आवाहन शिवसेनेने केले आहे.
Rokhthok






