Home Breaking News धक्कादायक……खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

धक्कादायक……खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

● उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास ● कार्यकर्त्यांवर कोसळला दुःखाचा डोंगर

1682

उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
कार्यकर्त्यांवर कोसळला दुःखाचा डोंगर

MP Balu Dhanorkar | खासदार बाळू धानोरकर यांची अचानक प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रविवार दि.28 मे ला एअर अॅम्बुलन्सने (air ambulance) दिल्ली येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. खासदार धानोरकर कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार आहेत. MP Balu Dhanorkar is the only Congress MP in the state.

Img 20250422 wa0027

चार दिवसांपूर्वी नागपुरातील अरिहंत या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोनचा उपचार सुरू होता. संसर्ग वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली. काही वर्षांपूर्वी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आतड्यावर शस्त्रक्रिया झाली होती. याच आतड्याला संसर्ग झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यामुळे उपचारासाठी वेदांता येथे हलविण्यात आले होते.

Img 20250103 Wa0009

खासदार बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे शनिवारी निधन झाले होते. रविवारी भद्रावती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, यावेळी खासदार धानोरकर प्रकृती अस्वस्थ असल्याने अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते.

खासदार बाळू धानोरकर कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार होते. तडफदार आणि डॅशिंग अशी त्यांची ओळख होती. ते स्वतः खासदार तर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर ह्या आमदार आहेत. चंद्रपूर- आर्णी लोकसभा क्षेत्रात त्यांचा मोठा जनाधार आहे. त्यांच्या अनपेक्षित निधनाने कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Rokhthok News