● LCB पथकाने चौघांना घेतले ताब्यात
Crime News | शिकले-सवरलेले तरुण सरकारी नोकरी मिळावी म्हणून भामट्याच्या नादी लागतात आणि लुबाडले जातात. स्थापत्य अभियंता असलेल्या पदवीधर तरुणाला सरकारी नोकरी लावून देतो अशी थाप मारून पुण्यातील नटवरलालने तब्बल 21 लाख रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील भामट्यासह चौघांना ताब्यात घेत चारचाकी वाहनासह 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Natwarlal from Pune put lime worth Rs 21 lakh.

पराग दिलीप मानकर (31) हा तरुण बि.ई. सिव्हील पदवीधर असून तो मातानगर राळेगांव येथील निवासी आहे. नोकरीच्या शोधात असताना त्याने सहा. अभियंता या पदाकरीता परिक्षा दिली होती. त्या परिक्षेमध्ये तो पास झाला होता, आणि त्यांचे नांव प्रतिक्षायादीत होते. अशात त्याची ओळख मल्लीकार्जुन पाटील राहणार पुणे यांचे सोबत झाली. त्याने वरिष्ठ पातळीवर ओळखी असल्याचा बनाव करत ऑर्डर काढून देतो असे सांगितले. तर 4 एप्रिल ते 4 मे 2024 या एक महिन्यात पराग यांचेकडून तब्बल 21 लाख रुपये उकळले.
मल्लीकार्जुन पाटील व त्याचे साथीदारांनी पराग मानकर यांना अभियांत्रीकी सहाय्यक गट ब ची बनावट ऑर्डर दिली. तसेच त्याचे कडून नागपुर परिसरातील एका रोडचे खोटे खोटेच inspection पण करवून घेतले. त्यावेळी पराग मानकर यांना मोबाईलवर आलेल्या संदेशावरुन मल्लीकार्जुन पाटील व त्याचे साथीदारांविषयी संशय आला. त्याने अधिक चौकशी केली असता आपली फसवणुक झाल्याचे त्यांचे लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पराग यांनी मल्लीकार्जुन पाटील व त्याचे साथीदारांना आपले पैसे परत द्या असा त्तकादा लावला. परंतु मल्लीकार्जुन पाटील व त्याचे साथीदारांनी त्यास कोणतीही रक्कम परत दिली नाही. त्यामुळे पराग मानकर यांनी दिनांक 24 जुलै ला राळेगांव पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघता विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रीक माहितीचे आधारे मुख्य आरोपी मल्लीकार्जुन बाबुराव पाटील रा. वाघोली पुणे याला ताब्यात घेत विचारणा केली असता घटनेचे बिंग फुटले. याप्रकरणी त्याचे साथीदार अनुराग उर्फ योगेश सुरेंद्र चव्हाण (33) रा. प्रवेश नगर नागपुर, अरविंद माधवराव मोहाडीकर (37) रा. नागपुर, राहुल कमलप्रसाद रंगारीया (45) रा. नागपुर यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना सुध्दा अटक करण्यात आली. यावेळी त्यांचे जवळून 4 लाख रुपये रोख तर गुन्हयात वापरलेले किया कंपनीचे चारचाकी वाहन किंमत 9 लाख असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने, यांचे मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, API अजयकुमार वाढवे, API विजय महाले, PSI धनराज हाके, उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, योगेश डगवार, निलेश निमकर, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, किशोर झेंडेकर, अमीत झेंडेकर, बबलु चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, नरेश राउत, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ROKHTHOK NEWS