Home Breaking News तरुणाने गळफास लावून संपवले आयुष्य

तरुणाने गळफास लावून संपवले आयुष्य

● आर्थिक विवंचना आत्महत्येस कारणीभूत

C1 20250106 19304057

आर्थिक विवंचना आत्महत्येस कारणीभूत

Sad News | तालुक्यातील बेसा येथे वास्तव्यास असलेल्या 24 वर्षीय तरुणाने गळफास लावून आयुष्य संपवल्याची घटना सोमवारी 4 वाजता उघडकीस आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. The young man ended his life by hanging himself

विनीत शैलेश वाघमारे (24) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह बेसा येथे वास्तव्यास होता. शेती व लहानसहान कामे करून तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. सातत्याने होणारी नापिकी व वाढणारे कर्ज यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता असे बोलल्या जात आहे. याच कारणाने त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असा कयास लावल्या जात आहे.

C1 20260430

घटनेच्या दिवशी घरी कोणीच नसल्याचे बघून त्याने आपल्या राहत्या घरी दुपट्ट्याच्या साह्याने गळफास घेतला. ही बाब घरातील मंडळींना कळताच त्यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009