Home Breaking News माजी आमदार नांदेकरांची New innings

माजी आमदार नांदेकरांची New innings

● हेच निवडणुकीपूर्वी असतं तर चित्र बदलले असते

1337
C1 20241223 07305338
हेच निवडणुकीपूर्वी असतं तर चित्र बदलले असते

Political News | शिवसेना (उबाठा) पक्षातून पदमुक्त करण्यात आल्यानंतर माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी शेकडो समर्थक व आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात शनिवारी प्रवेश घेतला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्यातील भारदस्त मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती होती. नांदेकरांचा हाच निर्णय निवडणुकीपूर्वी असता तर कदाचित विधानसभेतील चित्र बदललेलं असतं असे बोलल्या जात आहे. Former MLA Vishwas Nandekar took a big decision after being dismissed from Shiv Sena (UBT) party.

Img 20250422 wa0027

वणी विधानसभेतील खमक्या नेता, डॅशिंग व परखड नेतृत्व असणारे माजी आमदार विश्वास नांदेकर हे कायम कट्टर शिवसैनिक राहिलेले आहे. शिक्षकी पेशात असताना ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावून गेले आणि शिवसेनेत दाखल झाले. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार आणि पक्षाची महत्वपूर्ण पदे त्यांनी उपभोगली. विविध निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये त्यांनी आपला करिष्मा सिद्ध केला आहे.

Img 20250103 Wa0009

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाने भाकरी फिरवली आणि नांदेकरांना उमेदवारी नाकारली. त्यांचे परंपरागत विरोधक असलेल्या आ. संजय देरकरांना उमेदवारी बहाल केल्याने माजी आमदार नांदेकरांनी पक्षविरोधी कृत्य केले. यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाने त्यांना व त्यांच्या समर्थकांना पक्षाच्या महत्वपूर्ण पदावरून पदमुक्त केले, तेव्हाच नांदेकरांची पुढील राजकीय रणनीती काय असेल याकडे लक्ष लागले होते.

माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांच्‍या शिंदे गटातील प्रवेशामुळे राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे. आक्रमक नेता पक्षाला मिळाल्‍यामुळे यवतमाळ जिल्‍हयातील अनेक तालुक्‍यामध्‍ये नांदेकरांचा असणारा प्रभाव पक्षाला लाभदायक ठरणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीच्या होणार असून नांदेकरांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने महायुती भक्कम झाली आहे.

माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांनी आपल्‍या समर्थकांसह शिंदे सेनेत प्रवेश केला. यामध्‍ये वणी, मारेगाव, झरी तालुक्‍यातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे लोकप्रतिनिधी तथा पदाधिकारी माजी तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, संजय आवारी, चंद्रकांत घुगूल तर बाजार समिती उप सभापती जिवन काळे, संचालक ब्रम्‍हदेव जुनगरी, विक्रात चचडा युवा सेना विस्‍तारक अमरावती विभाग, जिल्‍हा संघटीका सीमा आवारी,  अजय नागपुरे, महेश चौधरी, सुनिल गेडाम, प्रविण पिसे यांचेसह शेकडो कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Rokhthok News