● यवतमाळ येथे ‘भव्य ट्रॅक्टर मोर्चा’
Big News | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यवतमाळमध्ये शिवसेनेच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 9 मे रोजी, शुक्रवार दुपारी 2 वाजता, वनवासी मारोती देवस्थान, आर्णी रोड येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. Shiv Sena aggressive for farmers’ loan waiver
विधानसभा निवडणुकापूर्वी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासने दिली होती. ती आश्वासने अजूनही अपूर्ण असल्याने, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
ट्रॅक्टर मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी हा लढा असल्याचे आयोजकांनी सांगितले. या मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड आणि पश्चिम विदर्भ संघटिका सागर पुरी करत आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे, किशोर इंगळे आणि संजय निखाडे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या संयोजनातून हा मोर्चा राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा प्रसिद्धी पात्रातून देण्यात आला आहे.
Rokhthok News






