● घराच्या बांधकामावरून झाला वाद
Crime News | क्षुल्लक कारणावरून वाद आणि मारहाण नित्याचेच झाले आहे. शहरातील भगतसिंग चौक परिसरात घराच्या बांधकामावरून एका व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. A person was severely beaten over the construction of a house.
शास्त्रीनगर मध्ये वास्तव्यास असलेल्या 60 वर्षीय महिलेसह प्रशांत मारोती गाडगे (40) व जागृती नगर येथील विकास गजानन बोंडे (21) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारकर्ता रविंद्र धनराज गुप्ता (30) यांना घराच्या बांधकामावरून मारहाण करण्यात आली होती.
रविंद्र गुप्ता यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 118 (1), 115 (2), 352, 351(2), (3), 3(5) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मारोती पाटील करत आहेत.
Rokhthok News






