Home Breaking News भीषण अपघात एक महिला ठार, दोन गंभीर

भीषण अपघात एक महिला ठार, दोन गंभीर

● भरधाव ऑटो पलटी, मार्डी जवळची घटना

C1 20250315 17193064

भरधाव ऑटो पलटी, मार्डी जवळची घटना

Sad News | वनोजा येथील काही महिला खैरी येथे असलेल्या शनी मंदिरात स्वयंपाक करायला ऑटोने निघाल्या. मार्डी गावाजवळ वाहन चालकाचे भरधाव ऑटो वरील नियंत्रण सुटले आणि ऑटो पलटी झाला. या घटनेत एक महिला चक्क ऑटो खाली दबली. जबर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोन महिलां गंभीर जखमी झाल्यात. ही घटना शनिवार दिनांक 15 मार्चला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. One woman killed, two seriously in the accident

शोभा पत्रू दारुणकर (65) असे मृतक महिलेचे नाव आहे तर माया तुकाराम कडूकर (55) व जिजा रमेश येसेकर (40) ह्या दोन महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत. त्या वनोजा येथील निवासी आहेत. घटनेच्या दिवशी गावातील एका व्यक्तीचा शनी मंदिरात स्वयंपाक होता. यामुळे गावातील सहा-सात महिला स्वयंपाकासाठी ऑटो मार्डी मार्गे खैरीच्या दिशेने निघाला.

मार्डी गावाजवळ खड्डा चुकवताना भरधाव ऑटो पलटी झाला. यात शोभा ऑटोच्या खाली दबली, तिला जबर मार लागला. अपघात होताच वाहन चालकाने पळ काढला. प्रत्यक्षदर्शींनी जखमी महिलांना उपचारार्थ वणी येथील रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासणीअंती शोभा यांना मृत घोषित केले तर दोन जखमीं महिलांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009