Home Breaking News ‘आप’च्या पदाधिकाऱ्याला जबर ‘मारहाण’

‘आप’च्या पदाधिकाऱ्याला जबर ‘मारहाण’

● सहा व्यक्तीवर गुन्हे दाखल

1343

सहा व्यक्तीवर गुन्हे दाखल

Wani News | दीपक चौपाटी परिसरात चहा प्यायला गेलेल्या आम आदमी पार्टीच्या तालुका संयोजकाला जबर मारहाण करण्यात आली. चार ते पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना दि 9 ऑगस्टला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षासह सहा जणांवर वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. A person was beaten with an iron rod by four to five people

Img 20250422 wa0027

इजहार ग्यासुद्दीन शेख (45), असलम अब्बास पठाण (27) व वसीम शेख (28), शेख रफीख शेख (28), अल्ताफ चिरी (27) व एक अनोळखी इसम (वय अंदाजे 50) अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निखिल ढुरके असे मारहाण करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो आम आदमी पार्टीचा तालुका संयोजक आहे.

Img 20250103 Wa0009

सविस्तर वृत्त असे की, निखिल हा आपल्या मित्रासमवेत दीपक चौपाटी परिसरात चहा प्यायला गेला होता. चहा घेतल्यानंतर त्यांचा मित्र तेथून निघून गेला व तो आपली दुचाकी काढत असतानाच तिथे एका काळ्या सिमेंट रंगाच्या स्कुटीवर आलेल्या असलम अब्बास पठाण व वसीम शेख याने काही कारणावरून निखिलला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली.

निखिलला मारहाण करत असतानाच पुन्हा तिघे तेथे आले. त्यातील एकाचे नाव ताहीर शेख रफीख शेख, दुसरा अल्ताफ चिरी तर तिसरा अज्ञात व्यक्तीने तोंडावर स्कार्फ बांधला होता. त्यानंतर चौघांनी मिळून निखिलला रॉडने बेदम मारहाण केली. तर तोंड बांधलेला त्यांच्या सोबत उभा होता. मारहाण करणारे इसम हे काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार ग्यासुद्दीन शेख यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप निखिलने केला आहे.

झालेल्या मारहाणीत निखिलच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली. त्याने वणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 6 जणांवर भांदविच्या कलम 307, 326, 143, 147, 148, 149, 506, 109 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3 (2) (VA), 3 (2), 3 (V), 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Rokhthok News