Home Breaking News चक्क विधानभवनात आंदोलन, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा…!

चक्क विधानभवनात आंदोलन, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा…!

● शिक्षकांच्या रिक्त पदांवरून आमदार देरकर संतप्त.....

C1 20260707

● शिक्षकांच्या रिक्त पदांवरून आमदार देरकर संतप्त…..

ROKHTHOK | यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आणि झरी-जामणी या आदिवासी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याच्या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळ परिसरात जोरदार आवाज उठविण्यात आला. “आमच्या शाळेत सरच नाहीत” हा विद्यार्थ्यांचा हताश करणारा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार संजय देरकर यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. Protest in Vidhan Bhavan, stop playing with the future of students…!

IMG 20261110 WA0010
IMG 20261110 WA0007

या भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांविना शिक्षण घ्यावे लागत असल्याची खंत देरकर यांनी व्यक्त केली.

C1 20261112
Screenshot 2026 11 08 16 12 26 03 439a3fec0400f8974d35eed09a31f914
IMG 20261105 WA0005(1)
IMG 20261102 WA0001

यावेळी आमदार देरकर यांनी सरकारवर भौगोलिक दुजाभावाचा आरोप करत, काही मतदारसंघांमध्ये शिक्षकांची पदे तत्काळ भरली जातात, मात्र वणी, मारेगाव आणि झरी-जामणीसारख्या दुर्गम भागांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. “वर्गात शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य कसे घडणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

IMG 20261109 WA0269(1)
Img 20250103 Wa0009

शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरून शाळांमध्ये नियमित अध्यापन सुरू करावे, शिक्षक भरती प्रक्रिया गतीमान करावी आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी याप्रसंगी करण्यात केली.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत हा लढा विधिमंडळापासून रस्त्यापर्यंत सुरू ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. “एका पिढीला शिक्षणापासून वंचित ठेवणे म्हणजे तिला अंधारात ढकलण्यासारखे आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात जाऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका देरकर यांनी घेतली.

Previous articleBig News : गुटखा माफियाला पोलिसांचा दणका !
Next articleविवाहितेची गळफास लावून आत्महत्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.