Home Breaking News चारगाव चौफुलीजवळ भीषण अपघात

चारगाव चौफुलीजवळ भीषण अपघात

● 25 वर्षीय प्रज्योत बुच्चे यांचा जागीच मृत्यू

C1 20261108

● 25 वर्षीय प्रज्योत बुच्चे यांचा जागीच मृत्यू

Sad News :
Fatal accident near Chargaon Chauphuli दिवाळीच्या आनंदावर विरजण घालणारी दुर्दैवी घटना चारगाव चौफुलीजवळ घडली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या भीषण अपघातात मंदार येथील 25 वर्षीय प्रज्योत बुच्चे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्रज्योत हे मंदर गावाहून तडाळीकडे जात असताना चारगाव चौफुली जवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की, त्यांना घटनास्थळीच प्राण गमवावे लागले.

IMG 20261102 WA0001

प्रज्योत यांच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या सहा महिन्यांची मुलगी आहे. ऐन उमेदीच्या वयात कुटुंबाचा आधार हरपल्याने बुच्चे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिवाळीच्या सणादिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे.

Img 20250103 Wa0009
Previous articleआगीचे तांडव, ऐन उत्सवात संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी..!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.