Home Breaking News पावसाचा जोर वाढला, सतर्कतेचे आवाहन

पावसाचा जोर वाढला, सतर्कतेचे आवाहन

● अतिवृष्टीची शक्यता, जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

307

अतिवृष्टीची शक्यता, जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

rain news | नागपूर येथील हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. पावसाचा जोर वाढला असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले आहे. The intensity of rain has increased and Collector Amol Yedge has appealed to be vigilant.

Img 20250422 wa0027

हवामान विभागाने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दाखविण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Img 20250103 Wa0009
नागरिकांना सूचना

हवामान खात्याने नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार संरक्षणात्मक कपडे घालावे आणि घरातच आश्रय घ्यावा. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर रहावे.

रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे,सखल भाग आणि जिथे पाणी साठते ते टाळा ते अनपेक्षितपणे पूर किंवा ओव्हरफ्लो होऊ शकतात.खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहन चालवणे टाळा असे सांगण्यात आले आहे.

पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका.पाणी दिसते त्यापेक्षा खोल आणि मजबूत असू शकते आणि त्यात मोडतोड, तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू, पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहा असे सुचविण्यात आले आहे.

शेतात असल्यास,पाऊसाचा अंदाज,आभाळ असल्यास तात्काळ घराकडे प्रस्थान करावे किंवा मजबूत अशा सुरक्षित स्थळाचा आश्रय घ्यावा,वाहन चालवित असल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घेऊन स्वत:जवळील मोबाईल बंद करण्यात यावे, जेणेकरून आपल्याकडे विज आकर्षित होणार नाही. विजेच्या वस्तूंशी संपर्क ठेवू नये व त्यापासुन दुर राहावे, वादळी पाऊस व विजांचा कडकडाट सुरू असल्यास अशावेळी घरातच राहावे,

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व तालुका यंत्रणांनी आपापल्या स्तरावरून नागरिकांना सूचना द्याव्यात असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.
ROKHTHOK NEWS