Home Breaking News राजू उंबरकर असेल महायुतीचे उमेदवार…!

राजू उंबरकर असेल महायुतीचे उमेदवार…!

● महायुतीकडे मनसेने मागीतल्‍या वीस जागा, वणीचा समावेश

3445
C1 20240612 15035832

महायुतीकडे मनसेने मागीतल्‍या वीस जागा, वणीचा समावेश

Political News | मनसेने राज्‍यात महायुतीला लोकसभेकरीता बिनशर्त पाठींबा दिला होता. माञ विधानसभेकरीता मनसेने महायुतीला राज्‍यातील वीस जागेचा प्रस्‍ताव दिल्‍याची माहीती आहे. यामध्‍ये वणी चा समावेश असुन अगामी विधानसभेत महायुतीचे उमेदवार राजु उंबरकर असणार का हे जागा वाटपाचा फार्मुला ठरल्‍यानंतरच स्‍पष्ट होणार आहे. Will Raju Umbarkar be the candidate of Mahayutti in the Legislative Assembly?

Img 20250422 wa0027

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची आज मुंबई येथे बैठक पार पडली असुन यामध्‍ये वीस जागेचा प्रस्‍ताव महायुतीला दिल्‍याची विश्‍वसनीय माहीती सुञाने दिली आहे. यामध्‍ये मुंबई व उपनगरातील बहुतांश जागेचा समावेश आहे. वरळी, दादर,  वर्सोवा, औरंगाबाद मध्‍य, शिवडी,  माहीम, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्‍वरी, ठाणे ग्रामीण, कल्‍याण ग्रामीण, वणी, पंढरपुर, भिवंडी ग्रामीण, घाटकोपर पश्चिम, पुणे, चेंबुर, नाशिक पुर्व या जागेचा समावेश असुन महायुती मागणी पुर्ण करतयं का ? हे बघणे औत्‍सूक्‍याचे ठरणार आहे.

Img 20250103 Wa0009

वणी विधानसभा क्षेञात राजु उंबरकर यांनी चांगलीच मोर्चे बांधणी केली आहे. सातत्‍याने ते जनहितार्थ उपक्रम राबवत असतांत विविध सर्व समावेशक कामांमुळे त्‍यांचा मतदारसंघातील जनाधार कमालीचा वाढला आहे. त्‍या सोबतच राज ठाकरे यांच्‍या विचाराने प्रभावीत झालेली तरुणाई मनसे सोबत आहे. मतदारसंघात मोठया प्रमाणात कार्यकर्त्‍यांची फौज उंबरकरांनी निर्माण केली आहे.
Rokhthok News