Home Breaking News राजू उंबरकरांना मतदांरांची पहिली पसंती

राजू उंबरकरांना मतदांरांची पहिली पसंती

● मार्डीतील सभेत तोबा गर्दी ● मारेगाव तालुका नेहमीच राहिला मनसेचा बालेकिल्ला

377
C1 20241115 09531622
मार्डीतील सभेत तोबा गर्दी
मारेगाव तालुका नेहमीच राहिला मनसेचा गड

Political News | विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहेत तसतशी निवडणुकीची चर्चा सुद्धा जोर धरत आहे. हळूहळू वाढणाऱ्या थंडीत दिवसा मात्र राजकीय चर्चेने वातावरण गरम होत आहे. राजकीय पक्ष विचारणारा जातीनिहाय गणिते कार्यकर्त्यांची ये जा सोबतच वणी विधानसभा मध्ये आपल्या आर्थिक संपन्नतेच्या जोरावर ठाकलेल्या उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे कामाचा माणूस नावाने चर्चेत असलेल्या राजू उंबरकर यांनी मात्र विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगला जोर धरला आहे. However, Raju Umbarkar has maintained a good momentum in the assembly constituencies.

Img 20250422 wa0027

गुरुवारी पार पडलेल्या मार्डी येथील सभेमध्ये मतदारांची जमलेली तोबा गर्दी विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची नांदी ठरवणारी असल्याचे मतदारांकडून बोलल्या जात आहे. गेल्या 18 ते 20 वर्षात उंबरकर यांनी सामाजिक सह राजकीय कार्यक्रमांमध्ये आघाडीवर राहून मतदारांशी नाळ जोडून ठेवलेली आहे. याचाच फायदा या निवडणुकीत मनसेला होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

Img 20250103 Wa0009

आजवरच्या निवडणुकांत मारेगाव तालुक्यात राजू उंबरकर नेहमी आघाडीवर राहिलेले आहे. त्यामुळे मारेगाव तालुका हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. गुरुवारी उंबरकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेतून त्यांनी मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन मांडून या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजयी करण्याचा आव्हान मतदारांना केले.

मारेगाव तालुक्यामध्ये उंबरकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून यावेळी मारेगाव तालुक्यात राजू उंबरकर आघाडीवर असतील असे चित्र निर्माण झाले आहे. याप्रसंगी तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शुभम भोयर, उदय खिरटकर, वामन चटकी, अनंता जुमडे, रोशन शिंदे, गुड्डू वैद्य, प्रशांत तोरे, धीरज हरबडे यांच्या सह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Rokhthok News