Home Breaking News रज्जाक पठाण यांची समाजवादी पार्टीला “सोडचिठ्ठी”

रज्जाक पठाण यांची समाजवादी पार्टीला “सोडचिठ्ठी”

● तडकाफडकी राजीनामा दिल्‍याने संभ्रम

1441

तडकाफडकी राजीनामा दिल्‍याने संभ्रम

Political News | दोन तपापासुन समाजवादी पार्टीत विविध पदे भुषविणारे व सध्‍यस्थितीत प्रदेश कोषाध्‍यक्ष असलेले रज्‍जाक पठाण यांनी आपल्‍या पदांचा व सदस्‍यत्‍वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे कार्यकर्त्‍यांत संभ्रम निर्माण झाला असुन त्‍यांची या पुढील रणनिती नेमकी काय असणार, याकडे लक्ष लागले आहे. Razjak Pathan resigned from his posts and membership.

Img 20250422 wa0027

रज्जाक पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. धडाकेबाज नेता म्‍हणुन त्‍यांनी ख्‍याती मिळवली आहे तर त्‍यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्‍यात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवल्‍यागेली तेव्‍हा पासुन त्‍यांनी शिवसेनेत कार्य केले आहे. शिवसैनिक म्‍हणुन त्‍यांनी आपला कार्यकाळ गाजवला आहे.

Img 20250103 Wa0009

वरिष्‍ठ नेते मुलायमसिंग यादव यांनी समाजवादी पार्टीला महाराष्‍ट्रात सक्रिय केले तेव्‍हा पासुन रज्‍जाक पठाण यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश घेतला. पार्टीने त्यांच्यावर विविध पदांची जबाबदारी दिली होती, ते सध्‍यस्थितीत समाजवादी पार्टीचे प्रदेश कोषाध्‍यक्ष होते. त्‍यांनी समाजवादी पार्टीच्‍या वतीने चंद्रपुर – आर्णी लोकसभेचे उमेदवार म्‍हणुन निवडणुक लढवली होती.

रज्‍जाक पठाण हे मितभाषी असुन सर्वसमावेशक,  सामाजीक व राजकीय पटलावर ते सदैव कार्यरत असतात. धडाकेबाज निर्णय आणि आंदोलनात्‍मक पाविञा घेण्‍यात ते माहीर आहेत. संघटनात्‍मक बांधणीसाठी लागणारे नेतृत्‍वगुण त्‍यांच्‍यात आहे. ते येथील मदिना मस्‍जीद चे अध्यक्ष देखील आहे.

रज्‍जाक पठाण यांनी समाजवादी पार्टीच्‍या प्रदेश कोषाध्‍यक्ष पदाचा राजीनामा प्रदेश अध्‍यक्ष तथा आमदार अबु असीम आजमी, प्रदेश महासचिव परवेज सिददीकी यांचेकडे पाठवला आहे. पठाण यांच्‍या राजीनाम्‍यामुळे कार्यकर्त्‍यांत संभ्रम निर्माण झाला असला तरी त्‍यांची पुढील रणनिती काय असणार याकडे लक्ष लागले आहे.
Rokhthok News