● सोज्वळ व्यक्तिमत्त्व हरपले
Sad News : येथील ज्येष्ठ व सेवानिवृत्त शिक्षक बापुराव विष्णुजी पोटे (84) यांचे वृद्धापकाळाने रविवार, दिनांक 25 मे रोजी रात्री 11 वाजता निधन झाले. Retired teacher Bapuraoji Pote passes away

त्यांच्या निधनामुळे वणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोटे सर हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
दै. सकाळचे वणी बातमीदार तुषार अतकारे यांचे ते सासरे होत. सोमवारी सकाळी वणी येथील मोक्षधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)