● बिअरबारमधील घटनेने खळबळ
Sad News : राज्य महामार्गावर असणाऱ्या एक बिअर बारच्या संरक्षण जाळीमध्ये जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता. अनपेक्षितपणे 28 वर्षीय कामगारांचा त्याला स्पर्श झाला. विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक 22 मे ला दुपारी 12 वाजता मारेगाव तालुक्यात घडली. Live electric current in the protective mesh of a beer bar
गणेश गणपत मेश्राम (28) रा. पेंढरी ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे. तो करणवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या एका बिअरबार मध्ये कामगार म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी दुपारी तो नेहमीप्रमाणे कामावर आला. बिअर बारच्या समोर असलेल्या संरक्षण जाळीला त्याचा स्पर्श होताच त्याला विजेचा जबर धक्का लागला. त्याला तात्काळ रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

होतकरू तरुणांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे पश्चात पत्नी, मुलगा, तीन महिन्यांची मुलगी व आई-वडील असा परिवार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी असे बोलल्या जात आहे.
Rokhthok News






