● शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार
Sad News :
येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा साहित्य– सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पत्रकार माधवराव गंगाधर सरपटवार (84) यांचे शुक्रवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंतिम यात्रा यवतमाळ रोडवरील राम शेवाळकर परिसरातून निघणार असल्याची माहिती नातलगांनी दिली. Sad…Madhavrao Sarpatwar passes away
सरपटवार सर यांनी शिक्षक म्हणून तसेच मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहात असताना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. श्री जैताई देवस्थान, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ अशा विविध संस्थांमधून त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. साहित्याच्या क्षेत्रातही त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन व लेखन केले होते. मितभाषी, सुस्वाभावी व शांत स्वभाव अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाने वणी शहरासह साहित्य, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी भारती, मुलगा शैलेश, मुलगी शिल्पा, सून, जावई, नातवंडे व भावंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)






