Home Breaking News Sand smuggling : हायवा ट्रक व जेसिबी मशीन ताब्यात

Sand smuggling : हायवा ट्रक व जेसिबी मशीन ताब्यात

● महसूलची दणदणीत कारवाई ● आरोपींचा उलगडा तापसानंतर

1615
C1 20250406 13414524

महसूलची दणदणीत कारवाई
आरोपींचा उलगडा तापसानंतर

Wani News | तालुक्यात रेती माफियांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. अनधिकृतपणे Sand smuggling रेती तस्करी जोमात सुरू आहे. रेती तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन सारसावल्याचे दिसत आहे. रविवारी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान पटाळा पुलाच्या खाली झोला घाटावर रेती उत्खनन व वाहतूक करताना तहसीलदारांनी दणदणीत कारवाई करत हायवा ट्रक व जेसिबी मशीन ताब्यात घेतली आहे. The Tehsildar took action and seized the Hiwa truck and the JCB machine

Img 20250422 wa0027

C1 20250406 13533680

तहसीलदार निखिल धुळधर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तलाठी अंकुश जाधव सह झोला घाट परिसरात रात्री दीड वाजताच्या सुमारास खाजगी वाहनाने जाऊन सापळा रचला. रात्री त्या घाटावर दोन हायवा उभे होते तर जेसिबीच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन करून हायवा क्रमांक MH-40-N-6670 मध्ये रेती भरत असल्याचे आढळून आले. त्याच वेळी महसूलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Img 20250103 Wa0009

महसुलचे अधिकारी आल्याचे लक्षात येताच रेती माफियांनी नदीतून वाहनास चंद्रपूर सीमेकडे नेले. अधिकाऱ्यांनी पटाळा पुलावरून जात एक हायवा व जेसिबी मशीन ताब्यात घेतली. तोपर्यंत वाहन चालकांनी एका हायवा ट्रक सह पलायन केले. महसूल च्या अधिकाऱ्यांनी अन्य कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. सकाळी सहा वाजताच्या दरम्यान पाच ब्रास रेतीसह एक ट्रक व जेसिबी मशीन ताब्यात घेतली.

याप्रकरणी महसूल प्रशासन कठोर भूमिका घेणार आहे. सोमवारी ट्रक व हायवा मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. झोला घाटातून आजपर्यंत उत्खनन झालेल्या रेतीचे मूल्यांकन करून दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. महसूल प्रशासन काय कारवाई करणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. मात्र या धडाकेबाज कारवाई मुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
Rokhthok News

Previous articleEknath Shinde : तो हार वणीतील कलावंतांची कलाकृती
Next articleआणि…त्याने मृत्यूला कवटाळले
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.