Home Breaking News बांधकामासाठी आणलेली रेती चोरट्याने केली लंपास

बांधकामासाठी आणलेली रेती चोरट्याने केली लंपास

● पोलिसांत तक्रार, कारवाई शून्य

577
C1 20240527 15251594

पोलिसांत तक्रार, कारवाई शून्य

Wani News | पोलिसांचा धाक सम्पूष्टात आल्याने चोरटे चांगलेच मस्तवाल झाले आहे. तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शेतात बांधकाम करण्यासाठी पाच ब्रास रेती विकत घेण्यात आली. शेतालगत रिचवण्यात आली. त्या रेतीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना मानकी येथे घडली. Five brass sanders were purchased for construction in the field.

Img 20250422 wa0027

तालुक्यातील मानकी येथे अनिल प्रल्हाद येमुलवार यांचे शेत आहे. या शेतात बांधकाम करण्यासाठी दिनांक 7 मे ला पाच ब्रास रेतीसाठी अधिकृत चालान फाडले. 13 तारखेला रेती भरलेला हायवा शेतात पाणी साचल्याने जावू शकत नसल्याने शेतालगत कायर मार्गावर रिचवण्यात आला.

Img 20250103 Wa0009

शेताच्या लगत टाकण्यात आलेली रेती 15 किंवा 16 मेच्या रात्री चोरट्यांनी लंपास केली. ही बाब शेत मालकाच्या लक्षात आल्यानंतर दिनांक 22 मे ला वणी पोलीस स्टेशन मध्ये याबाबतची रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच-सहा दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलिसांनी याबाबत कुठलेही पाऊल उचललेलं नाही, साधी चौकशी सुद्धा करण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.

बांधकामासाठी अशा पद्धतीने रोडच्या बाजूला टाकलेली रेती रात्री परस्पर चोरून नेण्याचे प्रकार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. यातील अनेक व्यक्तींकडे रेतीचे अधिकृत चालान न फाडता रेती टाकून घेतल्यामुळे याबाबतची अधिकृत तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दिल्या जात नाही. मात्र रीतसर तक्रार नोंदवल्यानंतरही कारवाई होत नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे.
Rokhthok News