Home Breaking News पक्षाचा आमदार होताच शिवसैनिक एक्‍शन मोडवर

पक्षाचा आमदार होताच शिवसैनिक एक्‍शन मोडवर

● संजय निखाडे आक्रमक, प्रशासनाला धारेवर धरत घेताहेत आंदोलनात्‍मक पविञा

C1 20241202 16542754

संजय निखाडे आक्रमक, प्रशासनाला धारेवर धरत घेताहेत आंदोलनात्‍मक पविञा

Political News | तब्‍बल 20 वर्षाच्‍या कालावधी नंतर शिवसेनेला हक्‍काचा आमदार मिळाला आहे. आ. संजय देरकर यांचे राजकीय सातत्‍य फळाला आल्‍याने शिवसेना (उबाठा)च्‍या पदाधिकाऱ्यांत चैतन्‍य संचारले आहे. आ. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम, विज वितरण व बाजार समितीच्‍या अधिकाऱ्यांना निवेदन देत उपजिल्‍हा प्रमुख संजय निखाडे यांनी आक्रमक पविञा घेतला आहे. जनहितार्थ कामांत दिरंगाई कराल तर आंदोलनात्‍मक पविञा घेण्‍यात येईल असा ईशारा निवेदनातुन देण्‍यात आला आहे. Shiv Sainik on action mode as soon as party MLA

सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या उप अभियंत्‍याला निवेदन देत तालुक्‍यातील निविदा व कार्यारंभ आदेश झालेल्‍या कामाला तातडीने सुरुवात करावी असे सुचवले आहे. त्‍याप्रमाणेच दोनवर्षा पुर्वी झालेल्‍या कामाची गुणवत्‍ता ढासळली आहे. निकृष्‍ट दर्जाची कामे झालेली असतांना संबधीत विभाग निद्रावस्‍थेत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

अल्‍पावधीतच रस्‍त्‍याची एैसीतैसी झालेली आहे. अनेक मार्गावर खड्डयाचे साम्राज्‍य निर्माण झालेले असतांना कंञाटदारांकडून त्‍या रस्‍त्‍याची डागडूजी तातडीने करावी अशी मागणी करण्‍यात आली आहे. तसेच कंञाटदार ऐकत नसेल तर त्‍यांना काळ्या यादीत समाविष्‍ठ करावे व परवाने रदद करावे असे निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

उपविभागातील शिरपुर ते आभई फाटा, शिंदोला ते कळमाना, शिंदोला ते कोलगांव, वणी ते नांदेपेरा मार्डी, वणी पुरड घोन्सा, मुकूटबन, वेळाबाई मोहदा पुरड या रस्‍त्‍याच्‍या बांधकामाच्या निविदा होवुन कार्यारंभ आदेश झालेले आहे. असे सर्व रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे. यात जर चालढकलपणा कराल तर तिव्र स्‍वरुपांचे आंदोलन शिवसेना उबाठा करेल असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रसंगी शहर प्रमुख सुधीर थेरे, डॉ. विलास बोबडे, प्रवीण खानझोडे, आनंद घोटेकर, राजेंद्र इद्दे, ज्ञानेश्वर बोबडे, आकाश आसुटकर यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते.

विज वितरणला अल्‍टीमेटम
शेतक-यांच्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे. काही फिटर वरून दिवसा तिन दिवस व रात्री तिन दिवस अशा पध्दतीने विजेचा पुरवठा केल्या जात आहे. यामुळे शेतपिंकांच्या सिंचनाची गैरसोय होत आहे. तरी ती गैरसोय टाळण्यासाठी शेतक-यांना दररोज पुढील तीन महिने सलग 24 तास विजेचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी विज वितरण विभागाच्‍या अभियंत्‍याला निवेदनातुन करण्‍यात आली असुन पंधरा दिवसाचा अल्‍टीमेटम देण्‍यात आला आहे. 
Rokhthok News