Home Breaking News त्या…मुजोर कंपनी प्रशासनाला धडा शिकवणार..!

त्या…मुजोर कंपनी प्रशासनाला धडा शिकवणार..!

● भूमीपुत्रावर अन्याय सहन करणार नाही ● काँग्रेस नेते संजय खाडे कडाडले

C1 20240610 11300061

भूमीपुत्रावरील अन्याय सहन करणार नाही
काँग्रेस नेते संजय खाडे कडाडले

Wani News | उकणी येथील ईगल इंफ्रा कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता ड्रायव्हर व हेल्परला कामावरून कमी केले. त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे अन्यथा मुजोर कंपनी प्रशासनाला धडा शिकवावा लागेल असा इशारा काँग्रेस नेते संजय खाडे यांनी दिला आहे. Congress leader Sanjay Khade has warned that Mujor company administration.

वणी उपविभागात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. त्यांच्या अधिनस्त अनेक खाजगी कंपन्या कार्यरत असून त्या सातत्याने भूमीपुत्रावर अन्याय करतात. परप्रांतीय कामगारांना आपलंसं करून भूमिपुत्रांना सापत्न वागणूक देत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.

C1 20260430

ईगल इंफ्रा कंपनीने स्थानिक ड्रायव्हर व हेल्परला कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले. यामुळे व्यथित कामगारांनी न्याय मिळावा याकरिता आमरण उपोषण आरंभले आहे. ही बाब काँग्रेस पक्षाचे नेते संजय खाडे यांना कळताच ते थेट उपोषण मंडपी पोहचले. त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व कंपनी प्रशासनाला धारेवर धरत भूमीपुत्रावरील अन्याय सहन करणार नाही असा इशारा दिला. तसेच कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असे स्पष्ट केले.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009