Home Breaking News Slaughter of cattle | दहा दिवसानंतरही गोवंश अवशेषांचा अक्षरशः सडा

Slaughter of cattle | दहा दिवसानंतरही गोवंश अवशेषांचा अक्षरशः सडा

● पालीकेच्‍या कार्यप्रणालीवर तिव्र नाराजी ● अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार ● राज्‍य गोसेवा आयोगाचे पथक वणीत

681
C1 20250121 09342014
पालीकेच्‍या कार्यप्रणालीवर तिव्र नाराजी
अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार
राज्‍य गोसेवा आयोगाचे पथक वणीत

Wani News | गोवंश हत्‍या प्रकरणाचे पडसाद मंत्रालयापर्यंत धडकलेत. गोवंश हत्‍या Slaughter of cattle प्रकरणाची राज्‍य गोसेवा आयोगाने दखल घेतली असून 4 सदस्‍य दिनांक 20 जानेवारीला वणीत धडकले. दहा दिवसानंतरही गोवंश अवशेषांचा अक्षरशः सडा घटनास्थळी दिसून आल्याने नाराजी व्यक्त करत पालिका व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. Slaughter of cattle case was taken cognizance of by State Goseva Commission

Img 20250422 wa0027

विश्रामगृहात संब‍धीत विभागातील अधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्‍यात आले. प्रामुख्‍याने यावेळी गोवंश हत्‍या Slaughter of cattle प्रकरणी पोलीस प्रशासनाची भुमिका संशयास्‍पद असल्‍याचा दावा राज्‍य गोसेवा आयोगाच्‍या सदस्‍यांनी केल्‍याचे बोलल्‍या जात आहे. एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी,  मुख्‍याधिकारी सचिन गाडे यांच्‍या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Img 20250103 Wa0009

शहरातील दिपक चौपाटी परीसरात दिनांक 11 जानेवारीला रस्‍त्‍यावर दोन गोवंशाचे धडावेगळे मुंडके व मांस आढळले होते. याघटनेनंतर शहरातील विविध हिंदुत्‍ववादी संघटना पेटुन उठल्‍या होत्‍या. पोलीस प्रशासन, पालीका प्रशासनाची कार्यप्रणाली चव्‍हाटयावर आली होती. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मुख्‍यमंत्र्यांच्‍या दरबारात प्रकरण रेटुन धरले होते. तर गोसेवा आयोगाला घडलेल्‍या घटनेबाबत अवगत करण्‍यात आले.

महाराष्‍ट्र गोसेवा आयोगाचे अध्‍यक्ष शेखर मुंदडा यांनी दिनांक 14 जानेवारीला जिल्‍हाधिकारी यांना पत्र दिले. पत्रात गायींची कत्‍तल करून अवशेष रस्‍त्‍यावर टाकल्‍याची घटना निदंनीय असल्याचे मत व्यक्त केले. गोहत्‍याबंदी कायद्याचे उल्‍लंघन झाल्याचे स्पष्ट करत गुन्‍हेगारावर अजामीनपात्र गुन्‍हा दाखल करून कडक शिक्षेची तरतुद असल्‍याचा पत्रात उल्‍लेख करत आयोगाने चौकशीसाठी समिती गठीत केली.

गोसेवा आयोगाने गठीत केलेल्‍या समितीचे सदस्‍य शहरात दाखल झाले. विश्रामगृहात एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी, नगर पालीका मुख्‍याधिकारी सचिन गाडे यांचेसह अन्‍य अधिकाऱ्यांचे बयान नोंदवले. याप्रसंगी हिंदू संघटनांनी गोसेवा आयोगाच्‍या समितीला निवेदन दिले. यानंतर समीतीच्‍या सदस्‍यांनी घटनास्‍थळ गाठले.

दिपक चौपाटी जवळील जत्रा मैदान येथील घटनास्‍थळाचा  गोसेवा आयोगाच्‍या सदस्‍यांनी पंचनामा केला. त्‍यावेळी त्‍याठिकाणी घटनेच्‍या दहा दिवसानंतरही गोवंश अवशेषांचा अक्षरशः सडा पडुन असल्‍याचे समितीच्‍या निदर्शनास आले. यामुळे समितीने पालिकेच्या कार्यप्रणालीवर तिव्र नाराजी व्‍यक्‍त केली. समितीने कत्‍तल करण्‍यात आलेल्‍या अनेक गोवंशाच्‍या कानात टोचलेले बिल्‍ले घटनास्‍थळावरून हस्‍तगत केले आहे. समितीने शासनाला अहवाल सादर केल्‍यानंतर कोण कारवाईच्‍या कचाटयात अडकणार हे बघणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ

गोवंश हत्‍येच्‍या घटनेनंतर वणी पोलीसांनी महाराष्‍ट्र पशु संरक्षण अधिनियमान्‍वये गुन्‍हा नोंद करत 8 आरोपींना अटक केली. पशु क्ररता अधिनियम, सांप्रदायीक सौदार्ह, गोहत्‍येची कलम नोंद केली असती तर आरोपींना जामीन मिळाला नसता असा दावा समितीने केला आहे. तसेच नगर पालिका हद्दीत बिनधास्त कत्‍तलखाना सुरू असतांना पालिका मुख्‍याधिकारी अनभिज्ञ कसे असा प्रश्‍न उपस्थित केला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.
Rokhthok News

Previous articleMaha Arogya Camp | हजारो रूग्‍णांनी घेतला लाभ
Next articleमनमानी..65 कामगारांना कामावरून काढले
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.