Home Breaking News सामजीक व राजकीय वलय संपवण्‍याचा डाव

सामजीक व राजकीय वलय संपवण्‍याचा डाव

● इजहार शेख वरील दाखल गुन्‍हे खोटे ● गुन्‍हे मागे घ्‍या, कॉग्रेसची मागणी

इजहार शेख वरील दाखल गुन्‍हे खोटे
गुन्‍हे मागे घ्‍या, कॉग्रेसची मागणी

Wani News | दिपक चौपाटी परिसरातील मारहाण प्रकरणात कोणताही सहभाग नसतांना हेतुपरस्‍पर इजहार शेख यांचे नांव गोवण्‍यात आले. त्‍यांचेवर विविध कलमान्‍वये गुन्‍हे नोंदविण्‍यात आल्‍याने कॉग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. त्‍यांचे सामाजिक व राजकीय वलय संपवण्‍याचा डाव असल्‍याचा आरोप करत माजी आमदार वामनराव कासावार यांचे आदेशाने कॉग्रेस पक्षाच्‍या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत तात्‍काळ गुन्‍हे मागे घ्‍यावे अशी मागणी केली आहे. Izhar Shaikh’s name was mentioned as he had no involvement in the beating case.

कॉग्रेस पक्षाचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष इजहार शेख हे पक्षाचे कट्टर निष्‍ठावंत पदाधिकारी आहेत. त्‍यांचा शहरात असणारा जनाधार विरोधकांना खुपत आहे. ते मागील 10 वर्षापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत. कोरोना काळात त्यांनी समाजाला केलेली मदत व त्यांचे कार्य लक्षणीय आहे. आजही ते निस्वार्थपणे रुग्णसेवेकरिता झटताहेत.

दीपक चौपाटी परिसरात 9 ऑगस्टला दुपारी “आप” पक्षाचे तालुका संयोजक असलेल्‍या कार्यकर्त्‍याला मारहाण करण्‍यात आली होती. त्‍या प्रकरणी इजहार शेख यांचा कोणताही संबध नाही तसेच हे गावातच उपस्थित नसतांना त्‍यांचेवर गुन्‍हे नोंदविण्‍यात आले आहेत. वणी पोलीसात दाखल करण्‍यात आलेले गुन्‍हे खोटे आहेत ते तातडीने मागे घ्‍यावे अशी मागणी कॉग्रेस पक्षाने केली आहे. तर मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्ष नेता, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्‍यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्यावर नोंदविण्‍यात आलेल्‍या खोट्या गुन्ह्याची चौकशी करून त्‍यांचेवर लावण्‍यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. अन्यथा वणी विधानसभा कॉंग्रेस पक्षाच्‍या वतीने तीव्र आंदोलन छेडण्‍यात येईल इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

उप विभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार यांना निवेदन देताना राजीव कासावार, डॉ. महेंद्र लोढा, आशीष खुळसंगे,  राकेश खुराणा, ओम ठाकूर, नईम अजीज, डॅनी सॅन्ड्रावार, डेव्हिड पेरकावार, अभिजीत सोनटक्के, घनश्याम पावडे, अशोक पांडे, तालुका अध्यक्ष संध्या बोबडे, शालिनी रासेकर, विजया आगबत्तलवार, महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले,  नीलिमा काळे, मंगला झिलपे, वंदना धगडी, ललिता बरशेट्टीवार यांचेसह कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्‍येने उपस्थित होते.
Rokhthok News