Home वणी परिसर चक्क…सौंदर्यीकरणाच्या जागेवरच अतिक्रमण

चक्क…सौंदर्यीकरणाच्या जागेवरच अतिक्रमण

IMG 20260522 WA0013

हटविण्याच्या मागणीला सरपंचाचा खो
शिवभक्त मंडळ संतप्त , गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
वणी बातमीदार : कायर येथील सौंदर्यकरनच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीला कायर ग्राम पंचायतीचे सरपंच सातत्याने खो देत असल्याने शिवभक्त मंडळ चांगलेच संतप्त झाले असून या सदर जागेवरील अतिक्रां हटविण्यासाठी गटविकास अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की कायर ग्राम पंचायत जवळील असलेल्या संतोष वस्त्र भंडार लगतच्या जागेवर सौंदयीकरन करण्यात यावे यासाठी शिवभक्त मंडळ यांनी ही जागा एका निवेदनव्दारे ग्राम पंचयतीकडे मागणी केली होती. परंतु काही ग्रामस्थांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे त्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी शिवभक्त मंडळाने जून२०२१ मध्ये ग्रामपंचायला निवेदन दिले व त्या जागेवरचे सौंदर्यीकरण करण्यासाठी मागणी केली पण सदर निवेदन देऊन दोन महिन्याच्या आसपास कालावधी लोटून देखील ग्रामपंचायत कडून व्यवस्थित प्रतिसाद मिळाला नाही सदरील जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भात विचारणा केली असता ग्रामसेवकांनी मासिक मिटिंगच्या ठरावानुसार त्या जागेवरील अतिक्रमण धारकांना नोटीस काढून त्यावर 4 ऑगस्ट ला स्वाक्षरी केली, परंतु ग्रामपंचायत सरपंच स्वाक्षरी करण्यास नकार देत असून उडवा उडवा उडावीची उत्तरे देत आहे. शिवभक्त मंडळ चांगलेच संतापून आहे. त्यामुळे शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर आंबोरे व सर्व पदाधीकार्यांनी सदर प्रकरणाची सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांना एका निवेदांव्दारे मागणी केली आहे.

IMG 20260511 WA0005

यावेळी शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर अंभोरे, उपाध्यक्ष,आकाश धाबेकर, सचिव, अतुल वाघाडे ,आणि सदस्य नितीन पेंदोर, रोशन मंडपाचे, समाधान निखाडे, अनुप गीरडकर, राहुल येनगंटीवार, विकास मुद्दमवर, व सचिन मिश्रा आदी उपस्थित होते.

Img 20250103 Wa0009