Home Breaking News यंदा ठरलंय, वारं फिरलंय, मनसेचे जोरदार शक्ती प्रदर्शन

यंदा ठरलंय, वारं फिरलंय, मनसेचे जोरदार शक्ती प्रदर्शन

● हजारो समर्थकांच्या साक्षीने मनसे नेते राजू उंबरकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

843
C1 20241025 18224298
हजारो समर्थकांच्या साक्षीने मनसे नेते राजू उंबरकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Political News | विदर्भात मनसेचे नेते राजू उंबरकर यांना विधानसभेची उमेदवारी सर्वप्रथम जाहीर करण्यात आली. राज ठाकरेंनी आपला विदर्भातील हुकमी एक्का पुन्हा एकदा रिंगणात उतरवला. शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबरला हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने वाजत गाजत, ढोलताशाच्या गजरात वणी विधानसभा मतदारसंघासाठी नामांकन अर्ज दाखल केला. Raj Thackeray once again brought his Vidarbha hukmi ace into the fray.

Img 20250422 wa0027

यंदा ठरलंय, वारं फिरलंय,अशी स्थिती उपस्थित जनसमुदाय बघून वाटायला लागली आहे. शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांत असणारा उत्साह महिला- भगिणीत संचारलेला जल्लोष अवर्णनीय असा होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांनी आपल्या हजारो समर्थकांसह शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास हारार्पण करुन रॅलीची सुरूवात करत शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

Img 20250103 Wa0009

राज्यात मागील काळामध्ये सुरू असलेल्या सत्ताधारी व विरोधी पक्षातील राजकीय चिखल फेक, नेत्यांच्या कोलांटउड्या यामुळे जनता प्रचंड वैतागली आहे. यंदा जनते समोर मनसेचा पर्याय उभा राहिला आहे. आज उंबरकर यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरली असेल.

वणी येथील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर करुन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. सातत्याने मतदारसंघातील नागरिकांच्या विविध अडी-अडचणी तथा समस्या प्रकर्षाने मनसेनी सोडल्या आहेत. सर्वसमावेशक, जनसामान्यांच्या हिताचे आंदोलने करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे यामुळे यंदा ठरलंय, वारं फिरलंय असं चित्र दिसायला लागले आहे.
Rokhthok News