Home Breaking News suicide : विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

suicide : विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

● विहिरीत उडी घेत संपवली जीवनयात्रा

C1 20250213 17335600

विहिरीत उडी घेत संपवली जीवनयात्रा

Sad News | मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथे 40 वर्षीय विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. आजारपणाला कंटाळून मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. A married woman ended her life by jumping into a well

मंदा आनंद ताकसांडे (40) असे मृतक विवाहितेचे नाव आहे, ती आपल्या परिवारासह बुरांडा येथे वास्तव्यास होती. मागील काही वर्षांपासून ती कर्करोगाने ग्रस्त होती. तिला होत असलेला त्रास असह्य झाल्याने अखेर तिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्यांनी सकाळी तिची शोधाशोध केली असता तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मृतक महिलेच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे.
Rokhthok News

Previous articleAccident : भीषण अपघातात विद्यार्थी ठार
Next articleaction of lcb : घरफोडी व चोरीच्या 11 गुन्ह्याचा छडा
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.