Home Breaking News आणि….तारेंद्र बोर्डे भाजपाचे ‘जिल्हाध्यक्ष’

आणि….तारेंद्र बोर्डे भाजपाचे ‘जिल्हाध्यक्ष’

● जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर

1322

जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर

BJP NEWS | भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक बांधणी मजबूत व्हावी याकरिता तरुण तडफदार नेत्याच्या हाती जिल्हाध्यक्ष पदाची महत्वपूर्ण सूत्रे सोपवली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. Party president Chandrasekhar Bawankule elected Tarendra Borde as the district president.

Img 20250422 wa0027

भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करतील अशी अपेक्षा वरिष्ठांनी व्यक्त केली आहे.

Img 20250103 Wa0009

राज्यातील 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र पक्षाने प्रसिद्ध केले आहे. सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी पक्ष सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तारेंद्र बोर्डे यांच्या निवडीने जिल्ह्याला खमक्या जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. तरुण, तडफदार आणि आक्रमक चेहरा दिल्या मुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होणार आहे.
ROKHTHOK NEWS