Home Breaking News अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

● मुकुटबन मार्गावरील घटना

2372

मुकुटबन मार्गावरील घटना

Wani News | वणी पोलीस स्टेशन हद्दीतील मानकी शिवारात नाल्याच्या पुलाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीस करताहेत. The body of an unknown person was found. Police are trying to identify him.

Img 20250422 wa0027

मानकी शिवारामध्ये नत्थूजी मते यांचे शेताला लागून असलेल्या नाल्याच्या पुलाखाली पूर्वेस एक पुरुष जातीचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी थेट घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

Img 20250103 Wa0009

शेताच्या लगत असलेल्या नाल्याच्या खाली मृतदेह मिळाल्याने पोलिसांना सखोल तपास करावा लागणार आहे. त्यातच सर्वप्रथम त्याची ओळख पटवणे गरजेची असून त्याचा मृत्यू कशाने झाला हे शोधण्याचे अवघड आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकणार आहे.
Rokhthok News