Home Breaking News कोंबड बाजारावर धाड, तिघांना अटक

कोंबड बाजारावर धाड, तिघांना अटक

● मुकुटबन पोलिसांची कारवाई

C1 20250106 07535669

मुकुटबन पोलिसांची कारवाई

Crime News | पिल्कीवाढोना शेत शिवारातील जंगलात कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती प्राप्त होताच मुकुटबन पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले असून चार कोंबडे व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी सायंकाळी 5 वाजता करण्यात आली. Raid on the kombad bazar, three arrested

विकास देवाजी राउत (35), गजानन फकरु चाटारे (35) हे दोघे राहणार चिचघाट ता. झरी व देवानंद
मारोती जगनाडे (36) रा. साखरा ता. वणी या तिघांना ताब्यात घेण्यात आले. उप विभागात कोंबड बाजाराचा विळखा वाढताना दिसत आहे. जंगल सदृश्य भागात लपूनछपून कोंबड्याच्या झुंजी लावून हरजितचा जुगार खेळल्या जात आहे.

C1 20260430

रविवारी दुपारी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी खाजगी वाहनाने घटनास्थळी धाव घेतली. जंगलात कोंबड्याच्या झुंजी लावून हरजितचा जुगार खेळल्या जात होता. पोलिसांची चाहुल लागताच कोबड बाजार खेळणारे पळून गेले. या कारवाईत तिघांना ताब्यात घेत चार कोंबडे, दोन धारदार काती असा 6 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई मुकुटबन पोलिसांनी केली.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009
Previous articleबापरे…नवजात बाळाला “चक्क” नालीत फेकले
Next articleतरुणाने गळफास लावून संपवले आयुष्य
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.