Home Breaking News निवडणुक झाली, आता विकासाचं बघू..!

निवडणुक झाली, आता विकासाचं बघू..!

● मतदारसंघात रस्ते विकासाची झळाळी

709
C1 20240512 00250801

मतदारसंघात रस्ते विकासाची झळाळी

Political News | चंद्रपूर-वणी-आणि लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम आटोपली, वर्क ऑर्डर झालेल्या विकास कामाची पूर्तता प्रामुख्याने करावी लागणार आहे. मतदारसंघात रस्ते विकासाची झळाळी बघायला मिळत असून शहरातील विठ्ठलवाडी परिसरात सुद्धा विविध ठिकाणी रस्त्याचे व नाल्यांचे बांधकाम जोरात सुरू आहे. निवडणुका झाल्यात, आता विकासाचा अजेंडा नागरिकांच्या हितासाठी राबवावा लागणार असल्याने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार जोमाने कामाला लागले आहेत. Construction of roads and drains is also going on in various places in Witthalwadi area of ​​the city.

Img 20250422 wa0027

निवडणुका येतात- जातात मात्र शाश्वत विकास कायम असतो. मतदारसंघातील विकासाकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी खेचून आणल्याचे सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला वणी विधानसभा मतदारसंघातून घसघशीत मताधिक्य असेल असे आ. बोदकुरवार यांना विश्वास आहे.

Img 20250103 Wa0009

स्वातंत्र्यानंतर वणी विधानसभा क्षेत्रात अवघ्या काही कालावधीतच रस्ते विकास व देवस्थानाचे सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्याचा अभूतपूर्व पराक्रम आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. विधानसभा क्षेत्रात एवढा मोठा निधी आणल्याने आमदारांची इतिहासातील ऐतिहासिक कार्यप्रणाली सिद्ध झाली आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात मागील आर्थिक वर्षात राज्य महामार्गाच्या विकासासाठी 47 कोटी, जिल्हा अंतर्गत रस्त्यासाठी 4 कोटी 10 लक्ष, ग्रामीण रस्ते विकासासाठी 24 कोटी 60 लक्ष, जनजाती क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत आदिवासी भागासाठी 10 कोटी 96 लक्ष रुपये तर जमीन अधिग्रहण करण्यासाठी 7 कोटी, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ग्रामीण दलित वस्ती विकासासाठी 4 कोटी रुपये, 25-15 अंतर्गत ग्रामीण भागासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. तर निवडणूक आचारसंहिते नंतर पुन्हा विविध शाश्वत विकासाकरिता निधीची उपलब्धता होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदारसंघातील प्रत्येक गावातील महत्वपूर्ण समस्या अवघ्या काही महिन्यातच सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत आ. बोदकुरवार यांनी व्यक्त केले आहे. रस्ते विकासासोबतच आरोग्य, सिंचन, शिक्षण आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Rokhthok News