Home Breaking News वणी विधानसभेत मताधिक्‍य त्‍यांचाच लोकसभेवर हक्‍क..!

वणी विधानसभेत मताधिक्‍य त्‍यांचाच लोकसभेवर हक्‍क..!

● चुरशीच्‍या लढतीत कोण मारणार बाजी

983
C1 20240416 11374467

चुरशीच्‍या लढतीत कोण मारणार बाजी

सुनील पाटील, वणी | चंद्रपूर-वणी- आर्णी मतदारसंघात चंद्रपुर, बल्‍लारपुर, राजुरा, वरोरा भद्रावती, आर्णी व वणी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वणीची लेक असलेली प्रतिभा धानोरकर तर आर्णी आजोळ असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्‍यात थेट लढत होत आहे. निवडणुक चुरशीची होणार असली तरी वणी विधानसभेत ज्‍या उमेदवराला मताधिक्‍य मिळेल त्‍यांचाच लोकसभेवर जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे. The majority of votes in the Wani Legislative Assembly is their right to the Lok Sabha

Img 20250422 wa0027

मागील सार्वञीक निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती होती. त्‍यावेळी युतीचे उमेदवार हंसराज अहिर तर कॉग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळु धानोरकर हे होते. चुरशीच्‍या लढतीत धानोरकर यांनी भाजपाच्‍या अहिर यांचा 44 हजार 763 मताधिक्‍याने पराभव केला होता. तर भाजपाचा बालेकिल्‍ला समजल्‍या जाणाऱ्या बल्‍लारपुर व चंद्रपुर मध्‍येच चक्‍क 61 हजार 992 एवढे मताधिक्‍य कॉग्रेसने मिळवले होते.

Img 20250103 Wa0009

लोकसभेच्‍या मागील निवडणुकीत चंद्रपुर जिल्‍हयातील चार विधानसभेत एक लाख तीन हजार 684 एवढे मताधिक्‍य कॉग्रेस पक्षाने मिळवले होते. तर भाजपाने वणी व आर्णी मतदारसंघात मताधिक्‍य प्राप्‍त केले होते. वणी विधानसभेत केवळ एक हजार 999 चा लिड भाजपाला होता. यावेळी वणी विधानसभेत कोण बाजी मारणार यावर विजयाचा मार्ग अवलंबुन आहे.

वणी विधानसभेत भाजपाचे प्राबल्‍य असल्‍याचे दिसत आहे. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केलेल्‍या विकास कामाचा फायदा महायुतीच्‍या उमेदवाराला होणार का हे बघणे औत्‍सूक्‍याचे आहे. त्‍यातच ग्रामीण भागात सत्ताधाऱ्या विरोधात शेतकरी संतप्‍त असल्‍याचे चिञ आहे. तर महाविकास आघाडीच्‍या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सहानुभूती मिळत असुन ती तालुक्‍याची लेक असल्‍याने मतदारांत आपुलकीची भावना दिसून येत आहे. वणी विधानसभेत दहा हजाराच्‍या वर ज्‍या उमेदवाराला मताधिक्‍य मिळेल त्‍यांना लोकसभेचा हक्‍क गाजवता येणार असल्‍याचे बोलल्‍या जात आहे.
Rokhthok News