Home Breaking News थरार… चालत्‍या बसचे चाक निखळले

थरार… चालत्‍या बसचे चाक निखळले

● सुदैवाने जीवीतहानी टळली ● 13 विद्यार्थिनी सुखरुप ● झरी येथे जात होती मानव मिशनची बस

1581

सुदैवाने जीवीतहानी टळली
13 विद्यार्थिनी सुखरुप
झरी येथे जात होती मानव मिशनची बस

Wani News | वणी आगार मधील मानव मिशनची बस झरी येथे जात असतांना थरार घडला. चक्‍क चालत्‍या बसचे चाक निखळले, त्‍या बस मध्‍ये 13 विद्यार्थिनी प्रवास करत होत्‍या. अचानक घडलेल्‍या या घटनेने काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. ही घटना शनिवार दिनांक 16 सप्‍टेंबरला सकाळी 8:30 वाजताच्‍या दरम्‍यान घडली. The wheel of the moving bus fell off, 13 female students were traveling in that bus.

Img 20250422 wa0027

वणी आगार मधील बसची अवस्‍था अतिशय बिकट झाली आहे. नादुरुस्‍त बसेस मार्गक्रमण करीत असल्‍याने प्रवाशांनाच आपल्‍या जीवाची काळजी करावी लागत असल्‍याचे वास्‍तव नाकारता येत नाही. शनिवारी सकाळी वणी ते झरी ही मानव मिशनची बस क्रमांक MH- 40-AQ- 6092 सकाळी झरी कडे जाण्‍यास निघाली.

Img 20250103 Wa0009

झरी गावाजवळील वळणावर बसचे समोरचे चाक अचानक निखळले. बस चालक अवी कनाके यांनी लगेचच बसवर नियंञण मिळवले यामुळे बस पलटी झाली नाही. घडलेल्‍या या प्रकारामुळे बस मधील शालेय विद्यार्थिनी कमालीच्‍या घाबरल्‍या. वाहक शितल दुरुतकर यांनी सावधानता बाळगत सर्व प्रवाशांना सुखरुप बसच्‍या खाली उतरवले.

वळण असल्‍यामुळे बसचा वेग कमी होता अन्‍यथा अघटीत घडले असते अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्‍या. तसेच अधिकारी चालक, वाहक व प्रवाशांच्‍या जीवावर उठलेत की काय असा संतप्‍त सवाल या निमित्‍ताने उप‍स्थित होत आहे.
ROKHTHOK NEWS