Home Breaking News त्या… तिघांवर बुधवारी अंत्यसंस्कार

त्या… तिघांवर बुधवारी अंत्यसंस्कार

● हृदयद्रावक घटनेमुळे समाजमन सुन्न

C1 20250617 12404411

हृदयद्रावक घटनेमुळे समाजमन सुन्न

Sad News :
वणी शहरातील रविनगर परिसरातील रहिवासी आणि सामाजिक क्षेत्रात परिचित असलेले राजा भैया जयस्वाल, त्यांच्या धर्मपत्नी श्रद्धा राजा जयस्वाल आणि कन्या काशी राजा जयस्वाल यांचे दिनांक 15 जून ला केदारनाथ येथे हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले. तिघांवर बुधवारी सकाळी 9 वाजता येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. Tragically, he died in a helicopter crash at Kedarnath.

दुर्दैवी घटनेत या तिघांनीही आपली सांसारिक यात्रा संपवली आणि प्रभूचरणी विलीन झाले. या आकस्मिक आणि हृदयद्रावक घटनेमुळे वणी शहरात शोककळा पसरली आहे. जयस्वाल कुटुंब वणीतील प्रतिष्ठित आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय कुटुंब म्हणून ओळखले जाते. राजा जयस्वाल हे शिवभक्त होते, त्यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिव महापुराण चे आयोजन काही महिन्यांपूर्वी केले होते. यामुळे जयस्वाल परिवार प्रकाशझोतात आले होते.

या तिघांची अंत्ययात्रा दिनांक 18 जून ला बुधवारी सकाळी 9 वाजता त्यांच्या रविनगर, वणी येथील राहत्या घरून निघून मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Img 20250103 Wa0009

या दुःखद प्रसंगी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि वणीकरांनी अंत्ययात्रेस उपस्थित राहून कुटुंबियांना मानसिक आधार द्यावा, असे आवाहन जयस्वाल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Rokhthok News