Home Breaking News दुःखद …दर्शनावरून परतताना भीषण अपघात

दुःखद …दर्शनावरून परतताना भीषण अपघात

● ट्रकची कारला धडक, शेख रफिक यांचा मृत्यू

C1 20251105 12433502
ट्रकची कारला धडक, शेख रफिक यांचा मृत्यू

Sad News :
गडचिरोली जिल्ह्यात जीलानी बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या रफिक शेख यांच्या कारला ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवार 4 नोव्हेंबरला रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. Tragic…terrible accident while returning from Darshan

शहरातील गुरुनगर येथील रहिवासी रफिक शेख (52) असे मृतकाचे नाव आहे ते दर महिन्याला जिलानी बाबांच्या दर्शनासाठी गडचिरोलीला जात असत. मंगळवारी सकाळी ते त्यांच्या आय-20 कार क्रमांक MH-29- AR- 5853 ने ड्रायव्हरसह दर्शनासाठी गेले होते. दर्शनावरून परत येत असताना दुर्दैवी घटना घडली.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमी चालकाला रुग्णालयात हलविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. या अपघातामुळे वणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Img 20250103 Wa0009