● राठोड, खंडेराव व पाटील यांचा समावेश
Wani News : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी शनिवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात वणी उपविभागातील तीन ठाणेदारांचा समावेश आहे. शिरपूर चे ठाणेदार संजय राठोड, मारेगावचे जनार्दन खंडेराव व पाटण चे ठाणेदार संदीप पाटील यांची बदली करण्यात आली आहे. Orders for transfer of police officers were issued on Saturday.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विहित निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असे पोलीस महा संचालक यांना सुचवले होते. त्यानुसार अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले.
यवतमाळ जिल्ह्यातून तीन पोलिस निरीक्षक, आठ सहायक पोलिस निरीक्षक व पाच पोलिस उपनिरीक्षक असे एकूण 16 अधिकारी बाहेर गेलेत, तर तीन पोलिस निरीक्षक, नऊ सहायक पोलिस निरीक्षक चार पोलिस उपनिरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत.
शिरपूरचे ठाणेदार संजय राठोड यांना परिक्षेत्रातील अमरावती ग्रामीण, पाटण चे ठाणेदार संदीप पाटील यांना बुलढाणा तर मारेगाव चे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांना वाशीम येथे देण्यात आले आहे.
● तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या सूचना ●
बदली आदेशाची प्रत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना बजावून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे तसेच बदली झालेल्यांनी बदलीवर येणाऱ्यांची वाट पाहू नये. बदली आदेशानंतर जे पोलिस अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत ते शिस्तभंग कारवाईस पात्र ठरतील असे आदेशीत करण्यात आले आहे.
Rokhthok News