● मद्य दुकाने बंद ठेवून नोंदवला निषेध
Wani News
राज्य शासनाकडून एक्साईज ड्युटी, वॅट टॅक्स तसेच नूतनीकरण शुल्कात करण्यात आलेल्या प्रचंड वाढीच्या निषेधार्थ वणी, झरी आणि मारेगाव परिसरातील सर्व मद्य परवानाधारकांनी आज आपली दुकाने बंद ठेवून सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. Liquor license holders unite against government’s tax hike
वाढलेल्या करप्रणाली व शुल्कामुळे दारूच्या किमतीत प्रचंड वाढ झालेली आहे त्यामुळे व्यवसायावर प्रचंड तणाव आलेला आहे. तसेच ग्राहक स्वस्त विकल्पांकडे वळणार असे दिसून येत आहे. बनावटी दारू किंवा मादक रसायनं ग्राहकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणार आहे.

तसेच महाराष्ट्र आणि लागतच्या राज्यांमधील करांमधील फरकाने तस्करीचे प्रमाण वाढणार आहे. यामुळे राज्याच्या महसुलवर देखील परिणाम होणार आहे. वैध व्यवसायांसाठी अनैतिक स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे हा उद्योग कोलमडण्याच्या मार्गावर असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
वणी येथील हॉटेल आशीर्वाद येथे एकत्र आलेल्या या परवानाधारकांनी संयुक्तपणे उपविभागीय अधिकारी वणी यांना निषेधपत्र सादर केले. यावेळी त्यांनी करवाढीमुळे व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाल्याचे सांगत शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला.
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार वणी यांनाही स्वतंत्र निवेदन सादर करून विरोध दर्शवला. या निषेध आंदोलनात युनियनचे सदस्य सुभाष डोरलीकर, आशिष मोहितकर, धीरज देवडे, रवी बोडेकर, विकी ठाकूरवार, मोरेश्वर उज्वलकर, अनुज मुकेवार, सुमित डोळस, संकेत गंधारे व परिसरातील शंभराहून अधिक मद्य परवानाधारकांनी हजेरी लावून एकजुट दाखवली.
Rokhthok News






