Home Breaking News उमेदवारीसाठी रस्सीखेच, संजय खाडे दिल्लीत

उमेदवारीसाठी रस्सीखेच, संजय खाडे दिल्लीत

● वामनराव कासावार आग्रही भूमिकेत

3384
C1 20241021 08180515

वामनराव कासावार आग्रही भूमिकेत

Political News | वणी विधानसभा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांनी प्रबळ दावेदारी केली असली तरी निवडून येण्याची क्षमता संजय खाडे यांच्यात असल्याचं मत पक्षश्रेष्ठींचं आहे. उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच होत असून संभाव्य उमेदवार दिल्लीत दाखल झाले आहे. Tug of war for candidacy, Sanjay Khade in Delhi

Img 20250422 wa0027

महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकास आघाडीत वणी विधानसभा काँग्रेस की शिवसेना (उबाठा) यापैकी कोणत्या पक्षाला सुटणार यावर अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर झाली नाही. परंतु काँग्रेस विदर्भात मोठया भावाच्या भूमिकेत वावरत असल्याने वणी मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटेल असे जवळपास निश्चित झाले आहे.

Img 20250103 Wa0009

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल्याने काँग्रेस व शिवसेना (उबाठा) पक्षातील दावेदारांना आमदारकीचे स्वप्न पडायला लागले आहे. यामुळे संभाव्य उमेदवारांची संख्या वाढली आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच संधी द्यावी अन्यथा “हरियाणा” सारखी गत होणार हे निश्चित.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत बोदकुरवार 45,178 मते मिळवून विजयी झाले. तर शिवसेना पक्षाचे विश्वास नांदेकर यांना 39,572 मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकाची 38,964 मते वामनराव कासावार यांना मिळाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजीवरेड्डी बोदकुरवार 67,710 मते मिळवून विजयी झाले. तर काँग्रेस पक्षाचे वामनराव बापूराव कासावर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतरः 27,795 मते एवढं होतं. विधानसभेच्या 2014 व 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी निर्विवाद यश संपादन केले. यामुळे आता मविआ ने विजयाची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी दिल्यास ही जागा खेचून आणता येईल, अन्यथा….
Rokhthok News