Home Breaking News भीषण…. दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या आणि…!

भीषण…. दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या आणि…!

● एक व्यक्ती गंभीर, तिघेजण जखमी

1611

एक व्यक्ती गंभीर, तिघेजण जखमी

Accident News | यवतमाळ महामार्ग अपघात प्रवण क्षेत्र झाले आहे. दररोज लहानसहान अपघात होताना दिसत असून शनिवार दिनांक 16 सप्टेंबरला दुपारी 4: 30 वाजताच्या दरम्यान दोन भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्या. या भीषण अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला तर तिघे जखमी झाले आहेत. Two speeding bikes collided with each other. In this terrible accident.

Img 20250422 wa0027

विनोद आनंदराव बोढाले (48) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते वणी तालुक्यातील वडगाव येथील निवासी असल्याची माहिती समोर येत आहे. महेश विजय नेवारे (25), अमित नामदेव सहारे (20) हे दोघे यवतमाळ येथील निवासी असल्याचे कळते. तर या घटनेत तेजस सुभाष बांगडे (22) हे सुद्धा जखमी झाले आहेत.

Img 20250103 Wa0009

यवतमाळ मार्गावरील मांगरुळ शिवारात दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या. अपघात अतिशय भीषण होता. एक दुचाकी यवतमाळ तर दुसरी वणीकडे जात होती. दोन्ही भरधाव असल्याने एकमेकांना भिडल्या. यात वणीकडे जात असलेल्या दुचाकी वरील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

घटना घडताच प्रत्यक्षदर्शींनी जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीला तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
Rokhthok News