Home Breaking News जगदंब मिनरल्स विरोधात ग्रामस्थ संतप्त !

जगदंब मिनरल्स विरोधात ग्रामस्थ संतप्त !

● प्रदूषण, ब्लास्टिंग आणि नुकसान भरपाईवरून खदानीविरोधात आवाज बुलंद

C1 20250710 21160019

प्रदूषण, ब्लास्टिंग आणि नुकसान भरपाईवरून खदानीविरोधात आवाज बुलंद

Wani News :
वणी तालुक्यातील कुंड्रा येथील ‘जगदंब मिनरल्स’ गिट्टी खदानीविरोधात ग्रामस्थ व शेतकऱ्यांत तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खदानीमुळे परिसरातील जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतपिके, घरांची सुरक्षितता, मजुरांचे आरोग्य आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम झाल्याचे सरपंचांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना अवगत केले आहे. Villagers angry against ‘Jagadamba Minerals’!

शेतकऱ्यांच्या शेतात थेट खदानीतील दगड पडून शेतीचे नुकसान होत आहे. ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना हादरे बसत असून, अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. शेतात काम करणाऱ्या मजुरांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असून, डस्टमुळे पिकांची गुणवत्ताही घटली आहे. खड्यांमध्ये साचणारे पाणी शेतात घुसून पीक नष्ट करत असल्याची गंभीर तक्रारही करण्यात आली आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खदानीतील कामगारांना नियमानुसार आठ तासांची शिफ्ट आणि योग्य पगार दिला जात नाही, तसेच सुरक्षा सुविधांचा अभाव आहे. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे.

Img 20250103 Wa0009

ग्रामपंचायत कुंड्रा मार्फत देण्यात आलेल्या निवेदनावर तातडीने कारवाई न झाल्यास गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून, प्रशासन काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Rokhthok News